• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed »
  • Independent Candidate Dies Of Heart Attack In Beed

…अन् मतदान केंद्रावर सोडला प्राण, अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

राज्यात आज सर्वत्र मतदान पार पडत असताना, मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवाराचे दुर्देवी निधन झाल्याची घटना समोर येत आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

  • By नारायण परब
Updated On: Nov 20, 2024 | 06:19 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे आज मतदानादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालय मतदान केंद्रावर घडली. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बाळासाहेब शिंदे मतदान केंद्रावर असताना त्यांना अचानक छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवू लागली. समर्थकांनी त्यांना थोडे पाणी पाजले आणि गर्दीपासून दूर एका मोकळ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात  पाठवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Maharashtra Election 2024: एक्झिट पोल नव्हे, ‘हे’ चार मुद्दे ठरवणार महाराष्ट्रात कुणाचे सरकार स्थापन होणार?

शिंदे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर शोककळा

बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभेतील प्रभावशाली नेते मानले जात होते. त्यांच्या निधनाने समर्थक, कुटुंबीय आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. मतदानादरम्यान त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर अधिकृत माहिती समोर येईल.

मतदान प्रक्रिया आणि निवडणुकीवरील परिणाम

घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निवडणूक आयोगाने या घटनेची नोंद घेतली असून, बीड विधानसभा निवडणुकीबाबत पुढील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 52 नुसार, निवडणुकीदरम्यान एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास संबंधित मतदारसंघातील मतदान पुढे ढकलले जाऊ शकते.

बाळासाहेब शिंदे यांच्या निधनाने बीड शहर आणि जिल्ह्यात दु:खाचे वातावरण आहे. त्यांच्या अचानक जाण्याने निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आला असून, निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष आहे.

Karale Master : कराळे मास्तरांना भाजप कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण; वर्ध्यातील Video व्हायरल

साताऱ्यात मतदान केंद्रावर मतदाराचे निधन

साताऱ्यातील मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु असताना  शाम नानासाहेब धायगुडे (वय 67) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर त्यांनी ईव्हीएम कक्षात जाऊन मतदान बटण दाबले. मात्र, त्याच क्षणी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक निधनाने मतदान केंद्रावर हळहळ व्यक्त करण्यात आली.  धायगुडे हे मुंबईमध्ये सनदी लेखापाल (चार्टड अकौंटंट) होते. परंतू काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी  मोरवे, ता. खंडाळा येथे स्थायिक झाले होते.

Web Title: Independent candidate dies of heart attack in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 06:17 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.