राधानगरी तालुक्यातील तरसंबळे हद्दीतील जंगलात शेळेवाडी येथील 28 वर्षीय तरुण आणि एका अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगलेतील 14 वर्षीय मुलगी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीमुळे प्रियकराला भेटण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील रायबरेलीला निघाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे लोणंद स्थानकात तिला ताब्यात घेण्यात आलं.
दगड धोंड्यांनीच भरलेल्या माळरानावर बिऊर-शांतिनगर येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील या शेतकऱ्यानं पावट्याचं हिरवं सोनं पिकवून सगळ्यांनाच थक्क केले आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सुमारे 50 लाख रुपये खर्चाच्या मंजूर असलेल्या या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत आहे.
कोल्हापुरात पुणे–बेंगलोर महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला शेकोटी करत उभ्या असलेल्या तिघांना चिरडले. पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चालकाबाबत तपास सुरू.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर थेट हल्ले होत आहेत, तर शेळ्या-गाई ठार होतायेत, पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे. रात्री मेहनतीने जपलेली शेती सकाळी उठून पाहिल्यावर उद्ध्वस्त झालेली असते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता. त्याचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे होते.
तिन्ही पक्षांकडून अधिकाधिक जागांवर दावा असल्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यास वेळ लागला. आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठकपार पडली.
कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आपण एकटी महिला असूनही समर्थपणे पार पाडली, असे धनश्री तोडकर म्हणाल्या.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी एकदिवसिय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 'पैसा उडाला, मत मिळालेच नाही' अशा स्वरूपाची परिस्थिती अनेक उमेदवारांच्या वाट्याला आलेली पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीकडे मजबूत संघटनात्मक बांधणी असून अनेक प्रभागांत पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत. मात्र, महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेशी जागावाटपावरून सातत्याने मतभेद होत आहेत.
किणी तालुका ते हातकणंगले येथे कोल्हापूर भायखळा, मुंबई जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवारी (दि. 22 ) मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून दरोडा…
माऊंट एव्हरेस्ट ओलांडून येणारा 'पट्टेरी हंस' साताऱ्यातील सुर्याचीवाडी तलावात दाखल झाला आहे. मायणी आणि खटाव परिसरातील तलाव परदेशी पाहुण्या पक्षांनी बहरले असून पक्षीनिरीक्षकांसाठी ही मोठी पर्वणी आहे.