शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे घरकुल मिळालेल्या घराच्या वादातून दोघा युवकांनी एका महिलेसह महिलेच्या पती व मुलीला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अविनाश किरण काळे व मयूर सुधाकर काळे या दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सुनिता काळे या महिलेचे सासरे चिंग्या काळे यांना काही वर्षापूर्वी घरकुल योजनेतून घर मिळालेले असून त्या घराच्या तीन खोल्या आहेत, दहा ऑक्टोबर रोजी सुनिता या खोलीची साफसफाई करत असताना अविनाश काळे व मयूर काळे तेथे आले आमी सुनिता यांना तुम्ही येथे राहायचे नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करु लागले यावेळी महिलेचे पती व मुलगी मध्ये आले असता दोघांनी शेजारी पडलेली लाकडी दांडके घेऊन सुनिता काळे यांच्या सह त्यांचे पती व मुलीला मारहाण केली, यामध्ये महिला काही प्रमाणात जखमी झाली असून याबाबत सुनिता शरद काळे (वय ३६ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अविनाश किरण काळे व मयूर सुधाकर काळे (दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.






