
salil deshmukh
मुंबई : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मोठा मुलगा सलील देशमुख यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सलील देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर (Bail To Salil Deshmukh) करण्यात आला आहे. ईडीने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात सलील आरोपी असल्याचं सांगण्यात आलं होतं.
[read_also content=”टाटा सन्सच्या अध्यक्षांचं नितीन गडकरींना पत्र, मिहानमध्ये गुंतवणूक करण्याची व्यक्त केली इच्छा https://www.navarashtra.com/maharashtra/tata-group-chief-natraj-chandrashekharans-letter-to-nitin-gadkari-about-investment-in-mihan-nrsr-340983.html”]
आज सलील देशमुख कोर्टात हजर झाल्यानंतर समन्स रद्द करत त्याला जामीनही मंजूर करण्यात आला आहे. सलीलला ३ लाखांच्या रोख हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सलील हे १७ व्या क्रमांकाचे आरोपी होते.