Buldhana Public Libraries Reading
वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकरी आणि वाचनाची आवड असणाऱ्यांना वाचनाचा छंद जोपासता यावा, या उदात्त हेतूने शासनाने ठिकठिकाणी वाचनालये सुरु केली आहे. बुलढाणा जिल्हयात ३३७ ग्रंथालय आहे. त्यापैकी ३०६ ग्रंथालये कार्यक्षम असल्याने अनुदानाचा लाभ घेतात. तर ३१ ग्रंथालय हे अकार्यक्षम असल्याने नावापुरतीच असल्याची बाब समोर आली.जिल्हा, तालुका व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विविध पुस्तके वाचनास मिळावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासह शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानांना संबंधात माहिती प्राप्त व्हावी, तर वाचनाचा छंद जोपणाऱ्यांना वाचनीय कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, चालसाहित्य व गडकिल्ल्यांवर आधारित पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने वाचकांच्या ज्ञानात भर पडते. विद्याथथ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ग्रंथालयातील पुस्तकांचा फायदा होतो. जिल्हयात आजघडीला ३३७ ग्रंथालये असून ३०६ ग्रंथालयांमध्ये वाचकांना सर्व सुविधा पुरविण्यात येत असल्याने शासनाचे अनुदान वितरीत करण्यात येते. तर २१ ग्रंथालय हे नावापुरतीच असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली.
सर्वदूर पोहोच असलेल्या इंटरनेटमुळे आज प्रत्येक हातात मोबाइल फोन आहे, त्यामुळे ताज्या बातम्या, स्पोर्टस, राजनीती, सांस्कृतिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी अथवा कथ, कादंबऱ्या, जीवनचरित्र वाचायला ही आता वायक वाचनालयाकडे येत नाही, कुकु, एफएम, पॉकेट एफएम सारख्या सेवेमुळे त्या सुविधा देखील सोयीस्कर झाल्या आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्याथ्यांनी खाजगी वाचनालय जवळ केले पुस्तके ही मनाला समृद्ध करतात, विचारांना प्रगल्भकरतात आणि माणसाला योग्य-अयोग्य यातील फरक समजतात. मात्र सोशल मीडियामुळे वाचकवर्ग दूर गेल्याने वाचन चळवळीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे, यातून मार्ग काढण्यासाठी केवळ वाचकामध्येच नव्हे, तर ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करून त्यांना अधिक आकर्षक बनवणे आणि शासनाने नियमित अनुदान देऊन वाचन संस्कृती टिकवणे काळाची गरज बनले.
शासनाच्यावतीने अ, ब, क, ड वर्गातील वाचनालयांना नेहमीत अनुदान वाटप करण्यात येते. यामध्ये ‘अ’ वर्गातील ग्रंथालय ११ लाख ५२ हजार, ‘ब’ वर्गासाठी ३ लाख ९० हजार, ‘क’ – वर्गासाठी १ लाख ५३ हजार व ‘ड’ – वर्गासाठी ४८ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येते.
इंटरनेट आणि डिजिटल सुविधांचा अभाव असल्यामुळे मध्यंतरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. मात्र, जिल्ह्यात १५ ते २० डिजिटल वाचनालन झाल्याने जिल्हा ग्रंथालय कार्यालय कडून सांगण्यात आले.






