Prataprao Jadhav on drought relief
Shegaon: २० किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शिवाय पशुधनाला लागणारा चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशा परिस्थीतीत प्रशासन करीत असलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन पार पडले, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. चव्हाण, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पशुधन अधिकारी, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह जिल्ह्यतील जल प्रकल्पाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गाव पातळीवर पाण्याचे नियोजन करा.
धरणातील गाळ जेसीबीद्वारा मोफत शेतकऱ्यांना काढून द्या. लोकसहभागातून नद्यांची खोलीकरण करा, जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश नद्या या सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीतून वाहत असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत दगडही वाहून येत असल्याने या नद्याचे दगड साचल्याने अरुंद झाले आहेत. त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करा गावातील प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळाले पाहिजे, या दृष्टीने गावातील सार्वजनिक विहिरीची साफसफाई करा, शिवाय गावामध्ये उंचीवर पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा जल जीवन अंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरींना तत्काळ विद्युत कनेक्शन उपलब्ध करून द्या, असे निर्देशही यावेळी ना. जाधव यांनी प्रशासनाला दिले.
पाणीटंचाई संदभर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाची माहिती केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जाणून घेतली. जिल्ह्यातील धरणात आणि प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणी साठा आणि मृतसाठा यांची योग्य सांगड घालून पिण्याचे पाणी आरक्षित करून ठेवावे व शिल्लक असलेले पाणी लक्षात घेता शेतकऱ्याना खरिपातील तुरीला एखादे पाणी देता येते का? याचीही चाचपणी अधिकाऱ्यानी करावी आणि शिल्लक असलले पाणी शेतक-यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून तुरीच्या उत्पन्नात घट होणार नाही.






