Shegaon 20 Kg Ganja Seized
Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सवर्णा शिवारातील यश ढाब्याजवळ सापळा रचला. या कारवाईत गांजासह २ दुचाकी आणि २ मोबाइल, असा एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १० लाख २६ हजार रुपये असल्याची माहिती आहे. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक यशोदा कणसे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात अमलीपदार्थाच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव केली.
नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत वडनेर भोलजी शिवारातील हॉटेल शान-ए-गुलिस्ता समोर नांदुरा पोलिसांनी कारवाई करत १ किलो ४७२ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची अंदाजित किमत ७३ हजार ६०० रुपये असून, याप्रकरणी २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनौव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल अरशद अब्दुल नासीर (२०, रा. कारंजा मोहत्त्या, वडनेर भोलजी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी २.३५ ते सायंकाळी ४.१० वाजतादरम्यान कारवाई करण्यात आली.
Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश






