

मयुर फडके, मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली (Cricketer Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Actress Anushka Sharma) यांची अल्पवयीन मुलगी सोशल मीडियावर (A minor girl on social media) बलात्काराच्या धमक्या दिल्याप्रकरणी (In the case of threats of rape) हैदराबादच्या रहिवाशाविरुद्ध (Hydrabad Resident) दाखल गुन्हा उच्च न्यायालयाने (High Court) रद्द केला. कोहलीची व्यवस्थापक ऍक्विलिया डिसोझा (Kohli's manager Aquilia D'Souza) यांनी आरोप वगळण्यास संमती दिल्यानंतर खंडपीठाने प्रकरण रद्द केले.
२४ ऑक्टोबर २०२१ रोजी टी २० विश्वचषकामध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(आयआयटी) हैदराबादमधून पदवीधर असलेल्या रामनागेश अकुबथिनीने कोहली आणि अनुष्काच्या मुलीविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केल्याचा आरोप होता. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अपमानकारक विनयशीलता/लैंगिक छळ), ५०६ (गुन्हेगारी धमकी), ५०० (बदनामी) आणि २०१ (पुरावा गायब) यांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतही गुन्हा करण्यात आला. त्यानतर अकुबथिनीला ११ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने अटक केली होती. कनिष्ठ न्यायालयाने अकुबथिनीला नऊ दिवसांनी जामीन मंजूर केला.
फेब्रुवारी २०२२ मध्ये गुन्हा रद्द करण्यासाठी अकुबथिनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपण एक गुणवंत विद्यार्थी असून जेईई परीक्षेत रँकधारक आहोत त्यासाठी आपल्याला नोकरीसाठी परदेशात जाण्याची इच्छा होती परंतु या प्रकरणामुळे कारकिर्दीत अडथळा निर्माण झाला असून गुन्हा रद्द करून भविष्याची वाटचाल सुकर करावी, अशी विनंती अकुबथिनाने याचिकेतून केली होती. न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर कोहलीच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करून खटला रद्द करण्यास कोणतिही हरकत नसल्याचे सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने अकुबथिनाविरोधातील गुन्हा रद्द केला.