ग्लोबल टीचर रणजीत डिसले गुरुजींच्या प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना चांगलीच तंबी दिली आहे.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
सोलापूर: ग्लोबल टीचर रणजीत डिसले गुरुजींच्या प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना चांगलीच तंबी दिली आहे.
ग्लोबल टीचर रणजीत दिसले गुरुजी यांना फुलराईट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली. पीएचडी करण्याकरता ऑगस्ट महिन्यात हवे असलेल्या रजेसाठी दिसले गुरुजी जानेवारी जिल्हा परिषदेत आले होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी लोहार व त्यांच्यात झालेल्या संवादावरून राज्यभर खळबळ उडाली होती. माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप करीत डिसले गुरुजींना अमेरिकेला जाण्यासाठी रजा देण्याबाबत सीईओ स्वामी यांना सूचना केली होती. डिसले गुरुजींना प्रशासनाने रजा मंजूर केली खरी पण यापूर्वी त्यांनी केलेल्या कामांची चौकशी लावली होती. चौकशी समितीने नुकताच याबाबत शिक्षण विभागाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे कारवाई होईल या भीतीने डिसले गुरुजींनी राजीनामा सादर केला. याबाबत प्रशासन प्रसारमाध्यमांतून पुन्हा ओरड सुरू झाल्यावर डिसले गुरुजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. प्रशासनाने आपल्यावर कारवाई करू नये अशी भूमिका डिसले गुरुजी यांनी घेतली. त्यानंतर डिसले गुरुजी यांनी दोनच दिवसांपूर्वी सीईओ स्वामी यांची भेट घेतली. पण शिक्षणाधिकारी लोहार यांनी दिलेल्या माहितीवरून बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे. सीईओ स्वामी संतप्त झाले व त्यांनी लोहार यांना लेखी सूचना केली आहे. प्रशासकीय कामकाजाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना अगोदर नीट माहिती घ्यावी व नंतरच त्यावर व्यवस्थित भाष्य करावे अशी सूचना स्वामी यांनी दिलेल्या लेखी आदेशात केली आहे. सीईओ स्वामी यांच्या लेखी आदेशामुळे शिक्षणाधिकारी लोहार यांची आता मात्र पंचायत झाली आहे.
Web Title: Ceo dilip swami to education officer lohar precautions taken from disaedle gurujis case nrab