Chandrapur News: कोळसा खाणींच्या धुळीचा शेतीला फटका; कापसाच्या उत्पादनावर धुळीचे साम्राज्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली

राजुरा तालुक्यातील परिसरात धुळीचे प्रदूषण वाढले आहे. वाहनांमुळे रस्त्यांवर धुळीचे लोट निर्माण होतात. या धुळीचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Chandrapur News: कोळसा खाणींच्या धुळीचा शेतीला फटका; कापसाच्या उत्पादनावर धुळीचे साम्राज्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Chandrapur News: कोळसा खाणींच्या धुळीचा शेतीला फटका; कापसाच्या उत्पादनावर धुळीचे साम्राज्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Published on: 
Updated on: 
  • वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे शेतपिकांवर धुळीचा थर

  • कापसाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याची तक्रार

  • कोळसा उत्पादनाचा विकास, पण शेतकऱ्यांचे नुकसान

चंद्रपूर: कोळसा उत्पादनाच्या माध्यमातून औद्योगिक विकासाचा गाडा वेगाने धावत असताना त्याची मोठी किंमत मात्र स्थानिक शेतकऱ्यांना मोजावी लागत असल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील साखरी-पवनी परिसरात दिसून येत आहे. वेकोलिच्या कोळसा खाणींमधून होणारे उत्खनन, ओव्हरबर्डनची वाहतूक आणि अवजड वाहनांची दिवसरात्र सुरू असलेली वर्दळ यामुळे परिसरात धुळीचे प्रदूषण वाढले आहे. या धुळीचा थेट परिणाम शेतशिवारावर होत असून कापसाच्या हिरव्यागार पिकांवर धुळीचा थर साचत आहे.

Chandrapur News: कोळसा खाणींच्या धुळीचा शेतीला फटका; कापसाच्या उत्पादनावर धुळीचे साम्राज्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Chandrapur News: धान कापणी संपताच शेतमजुरांवर बेरोजगारीचे संकट; मिरची तोडणीसाठी तेलंगणात धाव

परिणामी पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. राजुरा तालुक्यात वेकोलीच्या कोळसा खाणींचे मोठे जाळे विस्तारले आहे. कोळसा उत्खननासाठी मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. उत्खननातून बाहेर पडणारी माती, दगड आणि ओव्हरबर्डनची अवजड डंपरमधून वाहतूक केली जाते. त्यातच कोळसा वाहून नेणाऱ्या शेकडो ट्रकची सतत ये-जा सुरू असते. या वाहनांमुळे रस्त्यांवर धुळीचे लोट निर्माण होतात. हीच धूळ वाऱ्यासोबत आसपासच्या शेतांमध्ये पसरून पिकांवर साचत असल्याचे साखरी-पवनी परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

कापूस हे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे. वर्षभर मेहनत, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करून शेतकरी पीक जगवतात. मात्र, कोळसा खाणींमधून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे कापसाची पाने आणि झाडांवर धुळीचा थर साचत आहे. पानांवर धूळ साचल्याने सूर्यप्रकाश मिळण्यात आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकांची वाढ, फुलधारणा आणि बोंडांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आधीच शेतीचा वाढता खर्च आणि बाजारभावातील अनिश्चिततेने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता प्रदूषणाचे नवे संकट उभे ठाकले आहे.

शेतीसोबत आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

धुळीमुळे हवेत पसरणाऱ्या नागरिकांना खोकला, श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि अॅलर्जी यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ शेतीच्या नुकसानीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशीही जोडला गेला आहे. कोळसा उत्पादनातून शासनाला महसूल मिळत असला, तरी त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि नागरिकांच्या आरोग्याचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोळसा खाणींमुळे या भागामध्ये धुळीचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. कोळसा वाहून येणाऱ्या ट्रकांमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडते. याचा परिणाम पिकांवर होत आहे. पिकाचे उत्पादन घडलेल्या पिकांची वाढ होत नाही याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी वेकोलि प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही व नुकसान भरपाई दिली जात नाही.- अरुण उरकुडे, शेतकरी, साखरी

Chandrapur News: कोळसा खाणींच्या धुळीचा शेतीला फटका; कापसाच्या उत्पादनावर धुळीचे साम्राज्य, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Chandrapur News: ११ वर्षांनंतरही चंद्रपूर मेडिकल कॉलेज नव्या इमारतीत नाहीच; प्रतीक्षा संपणार कधी?

वेकोलिच्या शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे ही गावक-यांना त्रास आहे. अनेक घरांना तडे गेलेले आहेत, अवैद्य पार्किंग रस्त्यावर लावली जाते. वाहनाच्या वरदडीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडते. धुळीमुळे मानवी आरोग्यावर व शेतमालावर विपरीत परिणाम होत आहे. याबाबत वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन दिलेले आहेत परंतु अधिकारी शेतक-याच्या समस्या समजून घेत नाहीत.- संतोष डोंगे, उपसरपंच, साखरी.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)