चंद्रपुरातील ६६ जागांसाठी एकूण ५६२ उमेदवारांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत १७ प्रभागातील नामांकन दाखल केले आहे. आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. कोण माघार घेणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे…
घुग्घूसच्या धानोरा पॉईंटवर सिमेंट भरलेल्या भरधाव बलकरने कार, सलून व हॉटेलला धडक दिली. कारमधील तिघे गंभीर जखमी झाले, सलून चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर हॉटेल चालक भाजला. ट्रकचालक पसार.
केंद्राची संसदीय पॅनल समिती ताडोबा आणि नागपूरच्या ३ दिवसीय दौऱ्यावर होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पॅनलला खाणकामाच्या परिणामाबाबत माहिती दिली. ताडोबा-अंधारी प्रकल्पाचा केंद्राच्या संसदीय पॅनलने आढावा घेतला.
Google Maps: गुगल मॅुप्सने पुन्हा एकदा नवीन गोंधळ घातला. गुगल मॅप्सवर चंद्रपुरातील 25 गावांचे लोकेशन चुकीचे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता तंत्रज्ञानावर अनेक प्रश्नचिन्हस उपस्थित केले जात आहेत.
कोठारी वनपरिक्षेत्रालगतच्या शेतशिवारात वाघाच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा संकल्प जाहीर केला.
चिमूर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असली तरी देखील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी घागरफोड आंदोलनचा इशारा दिला आहे.
पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या संगीता अमृतकर पहिल्या महापौर होत्या. सध्या खा. प्रतिभा धानोरकर व विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यात दिलजमाई झाली आहे. निवडणूक जाहीर होताच जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ईव्हीएम मशीन नगर परिषदेमध्येच स्ट्राँग रुम तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, ज्यामुळे मशीन सुरक्षित राहाव्यात.
सीसीआयने अनेक ठिकाणी जिनिंग युनिट आठवड्यात केवळ २ ते ३ दिवस सुरू ठेवण्याचा आदेश दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. कापूस उत्पादनाच्या तुलनेत स्लॉटची संख्या अपुरी असल्याचं…
मलेरिया फवारणी कामगारांची 19 वर्षांची थकबाकी अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे कामगारांचा आक्रोश वाढत आहे. थकबाकीचा आकडा ४ कोटी ५ लाख ५९ हजार इतका आहे. थकबाकीसाठी अर्थमंत्री, आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
गोंडपिपरी तालुक्यात सध्यास्थितीत तीनही जिल्हा परिषद गटात महिलाचे आरक्षण आहे. तीनही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये महिलासाठी अनुकूल असे आरक्षण पडले. यामुळे पुरुषी उमेदवारांची चांगलीच गोची झाली.
चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात पत्नीने प्रियकरासोबत हातमिळवणी करून पती राजेश मेघवंशीची तलवारीने हत्या केली. काही महिन्यांपासून दुर्गा व प्रियकर चंद्रप्रकाशचे प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरू आहे.
गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या विभागातील कर्मचाऱ्यांनी आता असहकार आंदोलन पुकारले आहे. मागणी मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला…
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक प्रोत्साहन मिळावं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत मिळाली, यासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र गेल्या १८ वर्षाच्या कालावधीत शिष्यवृत्तीत वाढ करणार आली नाही.
पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धीतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण एटापल्ली ते मवेली हा रस्ता अवघ्या 7 महिन्यांत खराब झाला आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती देण्यात आली आहे. गडचांदूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ व मधून ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जाच्या छाननीदरम्यान त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले.
चंद्रपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने बिनवा गेट परिसरातील गोदामावर छापा टाकून ९० किलो सिंगल-यूज प्लास्टिक जप्त केले. गोदाम मालकाकडून ५ हजारांचा दंड वसूल केला असून पुन्हा गुन्हा केल्यास १० हजार…