चंद्रपुरातील ६६ जागांसाठी एकूण ५६२ उमेदवारांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत १७ प्रभागातील नामांकन दाखल केले आहे. आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. कोण माघार घेणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ईव्हीएम मशीन नगर परिषदेमध्येच स्ट्राँग रुम तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, ज्यामुळे मशीन सुरक्षित राहाव्यात.
सीसीआयने अनेक ठिकाणी जिनिंग युनिट आठवड्यात केवळ २ ते ३ दिवस सुरू ठेवण्याचा आदेश दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. कापूस उत्पादनाच्या तुलनेत स्लॉटची संख्या अपुरी असल्याचं म्हटलं जात आहे.
मलेरिया फवारणी कामगारांची 19 वर्षांची थकबाकी अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे कामगारांचा आक्रोश वाढत आहे. थकबाकीचा आकडा ४ कोटी ५ लाख ५९ हजार इतका आहे. थकबाकीसाठी अर्थमंत्री, आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
स्थानिक इंदिरानगर वॉर्डातील रुग्ण मोठ्या संखेने उप जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. नळाची पाइपलाइन लिकेज शोधून ते दुरुस्ती करणे सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात सध्यास्थितीत तीनही जिल्हा परिषद गटात महिलाचे आरक्षण आहे. तीनही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये महिलासाठी अनुकूल असे आरक्षण पडले. यामुळे पुरुषी उमेदवारांची चांगलीच गोची झाली.
गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या विभागातील कर्मचाऱ्यांनी आता असहकार आंदोलन पुकारले आहे. मागणी मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धीतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण एटापल्ली ते मवेली हा रस्ता अवघ्या 7 महिन्यांत खराब झाला आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती देण्यात आली आहे. गडचांदूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ व मधून ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जाच्या छाननीदरम्यान त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले.
भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्यात काट्याची लढत होईल. राष्ट्रीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाघांच्या घटनांमुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. २३ नोव्हेंबर रोजी वाघाने एका ५४ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
विवाह सोहळ्यांमुळे काही ठिकाणी मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे.