Chandrapur News: शेतशिवारात वाघाचा वावर, महिला मजूर घाबरल्या! भद्रावतीतील शेतकऱ्यांसमोर नवे संकट, वनविभागाला निवेदन

भद्रावती तालुक्यातील परिसरात वाघांचा वावर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महिला मजूर कापूस वेचणीसाठी शेतात जाण्यास तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.
Chandrapur News: शेतशिवारात वाघाचा वावर, महिला मजूर घाबरल्या! भद्रावतीतील शेतकऱ्यांसमोर नवे संकट, वनविभागाला निवेदन
Chandrapur News: शेतशिवारात वाघाचा वावर, महिला मजूर घाबरल्या! भद्रावतीतील शेतकऱ्यांसमोर नवे संकट, वनविभागाला निवेदन
Published on: 
Updated on: 
  • वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

  • शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता

  • शेतकऱ्यांच्या जीवितासह पशुधनाच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर

भद्रावती: तालुक्यातील विविध गावांच्या शेतशिवारात वाघासह बिबट्या, लांडगे आणि अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दर्शनामुळे महिला मजूर कापूस वेचणीसाठी शेतात जाण्यास तयार नसल्याने कापूस वेचणीचे काम रखडले आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. वनविभागाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच शेतशिवारात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी संरक्षण समितीने केली आहे. यासंदर्भात शनिवारी वनपरिक्षेत्राधिकारी के. डी. धानकुटे यांना निवेदन देण्यात आले.

Chandrapur News: शेतशिवारात वाघाचा वावर, महिला मजूर घाबरल्या! भद्रावतीतील शेतकऱ्यांसमोर नवे संकट, वनविभागाला निवेदन
Raigad News: काळ बदलला, वाहनं आली; तरीही शेतकऱ्यांसाठी बैलगाडी फायदेशीर... ग्रामीण भागात पारंपरिक साधनांना महत्त्व

भद्रावती वनपरिक्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या परिसरात वाघांचा वावर सातत्याने आढळतो. ताडोबा परिसरातील वाघ अन्न आणि शिकारीच्या शोधात ५० ते ६० किलोमीटरपर्यंत भ्रमण करून शेतशिवारात पोहोचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात कपाशी, तूर, हरभरा आणि धान ही पिके शेतात उभी आहेत. या पिकांमध्ये रानडुकरे, रोही, नीलगाय आणि हरीण यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच वाघ, बिबट्या आणि लांडग्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवितासह पशुधनाच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

या सर्व समस्यांवर वनविभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात द्यावी. तसेच वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील प्रश्न वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे पाठवून त्यावरही कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विठ्ठल रामचंद बदखल, विजय तुरारे, पंढरी बोडे, सुधीर सातपुते, नामदेव पारखी, अजय पारखी, जगदीश उमरे, प्रकाश उमरे, विश्वास कोंगरे, विजय खंगार, किशोर उपरे, नरेश दुर्योधन काळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

नुकसानभरपाई मिळत नसल्याची तक्रार

रोही आणि नीलगाय कपाशीच्या शेतात शिरून बोंडे खात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र कपाशीची झाडे मोडली नसल्याचे कारण देत नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी संरक्षण समितीने केला आहे. तसेच पीक नुकसानीच्या प्रकरणांत ३० दिवसांच्या आत भरपाई मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. या संदर्भात वनविभागाने आपली भूमिका लेखी स्वरूपात स्पष्ट करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Chandrapur News: शेतशिवारात वाघाचा वावर, महिला मजूर घाबरल्या! भद्रावतीतील शेतकऱ्यांसमोर नवे संकट, वनविभागाला निवेदन
Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यांवर धावपटूंचा जल्लोष! फ्रेंडशिप रनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग, तिसरे पर्व उत्साहात संपन्न

वनविभागाचे वाहन वारंवार बंद; नवीन वाहनाची मागणी

वाघाच्या बंदोबस्तासाठी पिंजरे लावणे, त्यामध्ये आमिष ठेवणे तसेच रात्री-अपरात्री घटनास्थळी पोहोचणे यासाठी वनविभागाच्या वाहनाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयाचे चारचाकी वाहन वारंवार बंद पडत असल्याने वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत वाहन बंद पडल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे वनपरिक्षेत्र कार्यालयाला तातडीने नवीन चारचाकी वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)