फोटो सौजन्य सोशल मिडिया
प्रकरणात ६९ वर्षीय वृद्धाने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे महावितरणमधून सिनियर ऑपरेटर पदावरून जानेवारी २०१५ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. ते पत्नी व दोन मुल सुना व नातवांसह राहतात. २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आपण डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगत, त्यांच्या आधारकार्डचा वापर करून नाशिकमधील रेणुकानगर येथे सिमकार्ड खरेदी करण्यात आले असून त्या सिमकार्डच्या आधारे मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडून त्यात कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले असून, हा पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.
काही मिनिटांतच त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. खाकी गणवेशातील व्यक्तीने आपण नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यातील निरीक्षक संदीप राव असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या कथित अधिकाऱ्याने बँक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा आरोप करत अटक होऊ शकते, अशी भीती दाखवली.
अटक टाळायची असल्यास २९ सप्टेंबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉल करून रक्कम एकाच खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. अटकेच्या भीतीने फिर्यादीनी सिडको एन-७ येथील पोस्ट ऑफिसमध्ये १० लाखांची एफडी मोडली. सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर भामट्यांनी दिलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर ११ लाख रुपये आस्टीजीएस केले. आठ ते दहा दिवसांत चौकशी पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील, असे सांगून आरबीआयच्या नावाने बनावट पावती दाखवण्यात आली.
६ ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रात डिजिटल अरेस्टसंदर्भातील बातमी वाचल्यानंतर आपलीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सिडको पोलिस ठाण्यातून दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक अतुल येरमे करत आहेत.आरबीआयमार्फत बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी सहकार्य करावे लागेल, असे सांगण्यात आले. सर्व बँक खाती, एफडी आणि आरडीमधील रक्कम एकाच ठिकाणी जमा करण्यास सांगण्यात आले. भिती पोटी फिर्यादी तयार झाले.






