केंद्र सरकारचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या अशोक ठोंबरेला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली. फडणवीस यांच्या कार्यक्रमात त्याची तोतयागिरी उघड झाली. सुटकेसमधून सरकारी पाट्या व ध्वज जप्त; दोघांवर गुन्हा दाखल.
डबलसीट बसलेले चालक व महिला नियमभंग करत असल्याने जाधव यांनी चालान डिव्हाइसद्वारे त्यांचा फोटो घेतला. मात्र, हे पाहताच चालकाने दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी आडवी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर (30) यांचा मृतदेह नळकांडी पुलाजवळ आढळला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून कोणतेही जखमेचे किंवा अपघाताचे ठसे नसल्याने संशय वाढला आहे.
गायत्री (वय ३६) हिचा विवाह दीपक सुभाष हरिचंद्रे (वय ४३, रा एल-१७५, म्हाडा) याच्याशी झाला. पतीपासून तिला दोन मुली आहेत. लग्नानंतर सासरच्या लोकांनी गायत्रीला सुरुवातीचे सहा ते सात महिने कसेबसे…
तसेच रस्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारला. यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला. हल्ल्यानंतर आरोपीने जर माझ्याविरुद्ध तक्रार केलीस, तर बघून घेतो, अशी धमकी दिली.
फिर्यादी मिरा फतपुरे यांनी आरोपी भगवान फतपुरे यास काही रक्कम उधार दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी ती रक्कम परत मागितली असता आरोपी संतापला होता. आरोपी भगवान हा दारूच्या नशेत आपल्या…
महिला डॉक्टरची आरोपी अमरनाथसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यातून मैत्रीचे नाते घट्ट होत असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला.
शाळेतील अन्य एका गतिमंद विद्यार्थ्याच्या पालकांनी मुलाला मारहाण झाल्याची तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही तपासात काळजीवाहक प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्याला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे समोर आले होते.
छत्रपती संभाजीनगरयेथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतिमंद विध्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाण करण्यात करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. . याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या शहरातील शहाबाजार परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या. तलवारीसारख्या धारदार हत्याराने वार करून समीर खान उर्फ मालेगाव याची हत्या. पाचही आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स कमी करण्याच्या नावाखाली लाखो डॉलरने गंडवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ११२ तरुणींसह सहा संचालकांना ताब्यात घेतले.
एका इंजिनीअर तरुणीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीने भारतीय दूतावासाच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत मायदेश गाठला. हे कृत्य कंपनीच्या मालकाने केले आहे. आरोपीचे नाव रामभाऊ…
नक्षत्रवाडी बाजार करून घरी परतताना दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर थांबले, त्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी सांगत आयकार्ड दाखवले आणि तुमच्या अंगठीचा नंबर तपासतो असे म्हणत सोन्याची अंगठी घेतली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाने तरुण अक्षय शिरसाटवर चाकू व रॉडने जीवघेणा हल्ला केला. तो गंभीर जखमी असून, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे.
छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी दोन खुनांच्या घटना! कन्नडमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून, तर शहरात ड्रग्सच्या वादातून मित्राचा गळा चिरला. ५ आरोपी अटकेत, २ फरार.
लग्नानंतर पहिल्या महिन्यात सासरच्यांकडून चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादीला माहेरून दोन लाख रुपये आणि ए.सी. घेऊन ये असा तगादा लावून मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.
छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी २.१० लाखांचा १० किलो गांजा जप्त करून इरफान पाशा या तस्कराला अटक केली. तो बंगळुरूस विक्रीसाठी निघाला होता. न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.