तळाघरमध्ये वाटले मुदत संपलेले क्लोरीवॅट ! संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धरले धारेवर

पिण्याच्या पाण्यात काहींनी क्लोरीवॅट टाकून पाणी प्यायल्याने अनेकांच्या पोटात दुखत असल्याचे सांगण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना जाब विचारत धारेवर धरले. संबंधित ग्रामसेवक यांनी ही गंभीर बाब अप्रत्यक्षपणे मान्य केली.
Expired chlorivat felt in the basement! Angry villagers took the Gram Panchayat administration to task
Published on: 
Updated on: 

रोहा : धाटाव विभागातील (Dhatav section) तळाघर ग्रामपंचायतीने (Talaghar Gram Panchayat) अनेक कुटुंबांना चक्क एक्सपायरी डेट (Expiry date) असलेले पाणी शुद्धीकरण (Water purification) जंतूविरहीत क्लोरीवॅट लिक्वीडचे (Sterile Chlorivat Liquid) वाटप केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. क्लोरीवॅट बाटलीवर मुदतबाह्य तारीख (Expiration date on chlorivat bottle) खोडून त्यावर हाताने २०२२ केल्याचे स्पष्ट दिसत असल्याने सर्वच धक्कादायक अशी गंभीर बाब ग्रामस्थ सागर भगत व सहकाऱ्यांनी उघड केली. पिण्याच्या पाण्यात काहींनी क्लोरीवॅट टाकून पाणी प्यायल्याने अनेकांच्या पोटात दुखत असल्याचे सांगण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना जाब विचारत धारेवर धरले. संबंधित ग्रामसेवक यांनी ही गंभीर बाब अप्रत्यक्षपणे मान्य केली. एक्सपायर झालेले क्लोरीवॅट काहींच्या वेळीच लक्षात आल्याने गावात मोठे अनर्थ टळल्याने ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामस्थांच्या आरोग्यशी खेळणे ही गंभीर बाब आहे. दुर्दैवी घटना घडली असती तर जबाबदार कोण ? याबाबत आम्ही आरोग्य विभागाकडे तक्रार करणार अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने ग्रामपंचायत प्रशासन चांगलेच हादरलेले दिसून आले. आता ग्रामस्थ नेमकी काय भूमिका घेणार ? हे लवकरच समोर येणार आहे. ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाने कधी क्लोरीवॅट पुरविले, त्यावरील डेट कोणी बदलली, याची सखोल चौकशी व्हावी. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशा ग्रामस्थांच्या मागणीवर पंचायत समिती प्रशासन नेमकी काय भूमिका घेते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वस्तीला पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या तळाघर ग्रामपंचायत एक्सपायरी प्रकरण घडल्याने सद्यस्थितीत एकच खळबळ उडाली आहे.