राज्यात सर्वत्र फॉर्म्युला वापरणार
पेड पोलीस बंदोबस्त ठेण्याचा निर्णय घेतल्याने गौतमीच्या मानधनापेक्षा दुप्पट रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे. त्याची झलक सांगोला तालुक्यातील पोलिसांनी दाखवून दिली. कार्यक्रम घ्यायचा आहे ना, तर मग तगडा बंदोबस्त तैनात केला तरच कार्यक्रमास परवानगी मिळेल. बंदोबस्त फुकट दिला जाणार नाही. कारण हा सामाजिक हिताचा उपक्रम नव्हे. या धोरणातून राज्यात सर्वत्र हा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.






