• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Increasing Traffic Congestion Is Affecting The People Of Washim

वाढत्या वाहतूक कोंडीचा वाशिमकरांवर परिणाम! स्थानिकांच्या कामातही अडथळा

वाशिम शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून प्रमुख चौकांत पोलिस कर्मचारी तैनात असतानाही शिस्त न राखल्याची तक्रार वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2025 | 02:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण
  • अनेक कर्मचारी वाहतूक व्यवस्थापनाचे औपचारिक प्रशिक्षण नसतानाच ड्युटीवर तैनात
  • विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर
वाशिम शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, दिवसभरातील कोणत्याही वेळेला मुख्य रस्त्यांवरून सहज प्रवास करणे ही मोठी कसरत ठरू लागली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिस वाहतूक शाखा स्थापन करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात शहरातील प्रमुख चौकांवर नियंत्रण ठेवण्यात ही शाखा अपयशी ठरत असल्याची व्यापक भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पाटणी चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, जिजाऊ चौक, पुसद नाका, हिंगोली नाका, अकोला नाका आणि पोलिस ठाणे चौक या वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी दररोज शेकडो वाहनांची रेलचेल असते. (Washim)

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी

चौकांत अधिकारी आणि तीन ते चार कर्मचारी उपस्थित असूनही वाहतूक नियमित न ठेवता उलट कोंडीच वाढू लागल्याने तैनात कर्मचाऱ्यांची भूमिका नेमकी काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. काही वेळा कोंडी इतकी तीव्र होते की दोन मिनिटांचा प्रवास पंधरा ते वीस मिनिटांत पूर्ण करावा लागतो. अनेकदा रिक्षा, दुचाकी, मालवाहतूक गाड्या आणि खासगी चारचाकी वाहने एकाच वेळी चौकातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याने अराजकतेचे वातावरण निर्माण होते. (Buldhana)

विशेष म्हणजे, वाहतूक शाखेत नेमलेले अनेक कर्मचारी वाहतूक व्यवस्थापनाचे औपचारिक प्रशिक्षण नसतानाच ड्युटीवर तैनात केल्याचे बोलले जाते. चौकात चार कर्मचारी असतानाही वाहनांचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी अधिक गुंतागुंत निर्माण होत असल्याने नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. काही कर्मचारी फक्त चलान फाडण्यावर जास्त भर देतात आणि प्रत्यक्ष वाहने मार्गदर्शन करून कोंडी कमी करण्याकडे दुर्लक्ष करतात, अशी टीकाही वाहनचालकांकडून होत आहे. कोंडीत अडकलेले चालक कर्मचारी हस्तक्षेप करून मार्ग मोकळा करतील या अपेक्षेने उभे राहतात; मात्र कर्मचारी उपस्थित असूनही कोणतेही स्पष्ट दिशादर्शन होत नाही, अशी तक्रार वारंवार समोर येते. त्यातच ट्रॅफिक सिग्नलची अकार्यक्षमता, चौकांत पार्किंग करणारी वाहनं, रस्त्यांवरील खडीकरणाची कामे व अनियमित वेगाने निघणाऱ्या वाहनांमुळे परिस्थिती आणखी बिघडते.

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण

वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर होतो, व्यापाऱ्यांचे व्यवहार बिघडतात, रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवेतील वाहनांना मार्ग मिळत नाही, अशा अनेक समस्यांचा रोजचा अनुभव नागरिक घेत आहेत. शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वाहनांची संख्या दुपटीने वाढली; परंतु रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक नियंत्रणाची तयारी मात्र त्यानुसार उभी राहिलेली नाही. नागरिकांचे म्हणणे आहे की, चलान वसुलीपेक्षा वाहतूक शाखेने प्रत्यक्ष चौकांवर उभे राहून वाहनांच्या हालचालीला दिशा देणे, ज्या ठिकाणी सतत कोंडी होते त्या मार्गांचे तांत्रिक पुनर्रचना करणे, अतिरिक्त प्रशिक्षित कर्मचारी नेमणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. वाहतूक विभागाने या समस्येकडे गांभीर्याने पाहत ठोस उपाययोजना केल्यासच शहरातील दैनंदिन कोंडी कमी होईल आणि वाशिमकरांच्या त्रासाला दिलासा मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Web Title: Increasing traffic congestion is affecting the people of washim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: गावठाण हद्दीत अतिक्रमित विहिरीचा मुद्दा ऐरणीवर; ‘पोकरा’ योजनेतील गैरप्रकाराबाबत अहवाल मागविला
1

Washim News: गावठाण हद्दीत अतिक्रमित विहिरीचा मुद्दा ऐरणीवर; ‘पोकरा’ योजनेतील गैरप्रकाराबाबत अहवाल मागविला

Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच
2

Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच

Washim News : कारच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; सात जण गंभीर जखमी
3

Washim News : कारच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; सात जण गंभीर जखमी

Washim News: झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ‘कब-बुलबुल’ कार्यक्रमाचे आयोजन
4

Washim News: झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ‘कब-बुलबुल’ कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘माझ्यासाठी माझा देश पहिले…’, कोण आहे Ridhima Pathak? देशाच्या स्वाभिमानासाठी BPL ला मारली लाथ

‘माझ्यासाठी माझा देश पहिले…’, कोण आहे Ridhima Pathak? देशाच्या स्वाभिमानासाठी BPL ला मारली लाथ

Jan 07, 2026 | 12:18 PM
BMC Elections 2026 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार

BMC Elections 2026 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार

Jan 07, 2026 | 12:18 PM
रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Jan 07, 2026 | 12:15 PM
Seismic Alert : रिंग ऑफ फायर पुन्हा सक्रिय? Philippinesमध्ये वारंवार येणाऱ्या भूकंपांमागे दडलंय ‘हे’ मोठं कारण

Seismic Alert : रिंग ऑफ फायर पुन्हा सक्रिय? Philippinesमध्ये वारंवार येणाऱ्या भूकंपांमागे दडलंय ‘हे’ मोठं कारण

Jan 07, 2026 | 12:09 PM
Thackeray Brothers Interview: ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर चर्चेत; सातारा ड्रग्ज प्रकरणावर राज-उद्धव ठाकरेंकडून सडकून टिका

Thackeray Brothers Interview: ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर चर्चेत; सातारा ड्रग्ज प्रकरणावर राज-उद्धव ठाकरेंकडून सडकून टिका

Jan 07, 2026 | 12:08 PM
अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

Jan 07, 2026 | 12:06 PM
Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ

Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ

Jan 07, 2026 | 12:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.