झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय ‘कब-बुलबुल’ उत्सव मंगळवारी (दि. ३०) उत्साहात पार पडला. या उत्सवात तालुक्यातील विविध शाळांमधील १४० हून अधिक कब-बुलबुल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थिनींनी अबला न राहता आत्मविश्वासाने सबल बनावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख जयंती समारोप कार्यक्रमात त्यांनी शिस्त, सद्वर्तन, आत्मसंरक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे इयत्ता ५ ते ८ वीतील विद्यार्थी पात्र असतील.
विदर्भ साहित्य संघ व स्व. सीमा शेटे स्मृतीस समर्पित अकोल्यातील ‘कवी कट्टा’ लेखिका संमेलनासाठी कामरगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद विद्यालयातील १२ विद्यार्थिनींची निवड झाली.
वाशिम जिल्ह्यातील पोकरा भाग-१ योजनेत लाखो रुपयांच्या गैरप्रकाराचा आरोप करत शेतकरी वसंत खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३३ पानांची पुराव्यासहित तक्रार दाखल केली आहे.
अनसिंग ग्रामपंचायतीतील गंभीर आर्थिक व प्रशासकीय गैरप्रकारप्रकरणी तत्कालीन सरपंच संतोष खंडारे यांची सरपंचपद व सदस्यत्व अपात्रता मंत्रीस्तरीय न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही कायम ठेवली आहे.
शेतकरी हिताच्या योजना प्रत्यक्षात वेळेत व पारदर्शकपणे राबवून कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
नेतृत्वात बदल झाल्यास शासकीय आरोग्य सेवेतही आमूलाग्र परिवर्तन शक्य आहे, याचे उदाहरण वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिले असून ऑक्टोबर महिन्यात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Washim Municipality Election: प्रचारासाठीचा कालावधी मर्यादित असताना, सर्वच राजकीय पक्षांकडून 'विकासाच्या मुद्द्याला' हात घालून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
घरी आल्यानंतर आईने विचारल्यावर सर्व प्रकाराची माहिती दिली. तिने सर्व घटनाक्रम सांगितला. 'आपण दोघे लग्न करू' असे, म्हणून कन्हाळे याने मालेगाव मार्गे मेहकर तालुक्यातील कहाळवाडी येथे नेल्याचे तिने सांगितले.
वाशिममध्ये एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या २० वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Crime News Live Updates Marathi : आज दिनांक ०३- ०८- २०२५ रोजी राज्यासह देश-विदेशातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर
वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडीओ चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी एका ४० वर्षीय विवाहित महिलेले गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
जळगाव शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि पावसाच्या सरी कोसळल्या.
श्रीकृष्ण यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सरकारी पक्षातर्फे पोलिस उपनिरीक्षक इमरान पठाण यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.
आकाशात अधूनमधून ढगांची गर्दीही असल्याने सावलीनेही किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हापुढे हा दिलासा फोल ठरत होता. दुपारी सर्वोच्च तापमान अनुभवण्यास मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव गावात धक्कादायक घटना घडली आहे. 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरणाच्या घटनेला तब्बल 5 दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही सुगावा लावलेला नाही.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका रिक्षाचालकाने मित्राच्या सहाय्याने दोन सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही मुलींना घटनेचे गांभीर्य ओळखून धावत्या रिक्षातूनच उड्या मारल्या.
विहिरीत पडल्यानंतर त्याने जोरजोरात आरडाओरड केली. त्याच्या आवाज ऐकून त्याची पत्नी तेथे आली. तेव्हा त्याचा मोठा भाऊ देविदास तेथून पळून गेला. त्यानंतर जन्मदास याला विहिरीतून बाहेर काढले.