Masur Theft Case : मसूरच्या मुख्य चौकात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 9 दुकानांना लक्ष्य

कराडमधील मसूरच्या मुख्य चौकात चोरट्यांनी एकाच रात्रीत नऊ दुकानांना लक्ष्य केले. शटरची कुलपे व कोयंडे तोडून 72 हजार रुपयांची रोकड लंपास केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Masur Theft Case : मसूरच्या मुख्य चौकात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 9  दुकानांना लक्ष्य
Masur Theft Case : मसूरच्या मुख्य चौकात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 9 दुकानांना लक्ष्य
Published on: 
Updated on: 
  • शटर तोडून 72 हजारांची रोकड लंपास

  • सीसीटीव्ही कॅमेरीही फोडण्याचा प्रयत्न

  • व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

Masur Theft Case : कराडच्या मसूर येथील रहदारीच्या मुख्य चौकात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत तब्बल 9 दुकानांची शटरची कुलपे व कोयंडे तोडून शुक्रवारी मध्यरात्र ते पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये काही दुकानांमधून रोकड व साहित्य चोरट्यांनी लंपास केले. एकूण 72 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

विशेषतः चोरट्यांनी दुकानांबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.

एका दिवसात अनेक दुकानांत दरोडा

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड-मसूर रस्त्यावरील मुख्य चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय चव्हाण यांच्या श्री कलेक्शन या कापड दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ड्रॉवरमधील 53 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. दुकानाबाहेरचा सीसीटीव्ही कॅमेराही यावेळी फोडण्यात आला.

तर शेजारील प्रकाश राजमाने यांच्या समर्थ हार्डवेअर दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्याच परिसरातील श्याम सेल्स दुकानाचे कुलूप तोडून तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी कराड रस्त्याच्या बाजूच्या सोनाली कुशन दुकानालाही लक्ष्य केले. मोमीन आयुर्वेदिक पतंजली दुकानाचे शटरचे कुलूप तोडून 1200 रुपयांची रोकड नेली.

Masur Theft Case : मसूरच्या मुख्य चौकात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 9  दुकानांना लक्ष्य
Chhatrapati Sugar Factory : छत्रपती कारखान्याचा उसाला आता प्रतिटन 3701 रुपयांचा दर; सुरुवातीला 3501 रुपये, तर उर्वरित 200 रुपये दिवाळीत देणार

किवळ रस्त्यावरील दुकानंही लक्ष्य

तसेच पंढरपूर रस्त्यावरील सुरेश निकम यांच्या स्वप्नाली किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी परिसरातील निगडीकर किराणा दुकानालाही लक्ष्य केले. दुकानातील 15,000 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. अजित उकिरडे यांच्या लक्ष्मी किराणा स्टोअर्स या दुकानाच्या शटरचा कोयंडा तोडून गल्ल्यातील 500 रुपयांची चिल्लर चोरली. तर यानंतर किवळ रस्त्याच्या दिशेने चोरट्यांनी मोर्चा वळवला. उदय जगदाळे यांच्या दारू दुकानाच्या शटरचा कोयंडा कटावणीच्या साहाय्याने तोडून 10 हजार रुपयांची रोकड नेली. त्याच रस्त्यावरील कल्याणी सेल्स या दुकानाच्या शटरचा कोयंडाही उचकटून व समोर असलेल्या जहांगीर शेख यांच्या पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटची पाकिटे व 500 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

Masur Theft Case : मसूरच्या मुख्य चौकात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 9  दुकानांना लक्ष्य
Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा

घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञ दाखल; सीसीटीव्हीत चोरटे कैद

चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परिसरातील काही दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसून आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. चोरट्यांनी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा, नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.

मुख्य चौकात रात्रीची पोलीस गस्त गायब? व्यापाऱ्यांचा सवाल

विशेषतः चोरी झालेली सर्व दुकाने मसूरच्या मुख्य रहदारीच्या चौकात व प्रमुख रस्त्यालगत आहेत. यापूर्वी या चौकात रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त असायची. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून चौकात रात्रीच्या गस्तीचा अस्त झाला आहे. पोलीस दिसत नसल्याची चर्चा नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे. अशा वर्दळीच्या ठिकाणी एकाच रात्री 9 दुकानांची शटर फोडली जात असतील, तर रात्रीच्या पोलीस गस्त गायब कशीॽ असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानांचे शटर उचकटून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना लक्ष्य करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.