फोटो सौजन्य सोशल मीडिया
अग्निशमन विभागाच्या २०१५ ते २०२६ या कालावधीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास फटाक्यांच्या दुकानांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांच्या संख्येत वर्षांनुसार चढ-उतार झाल्याचे दिसून येते. २०१६ मध्ये सर्वाधिक ९८२ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. त्यानंतर ही संख्या सातत्याने कमी होत वर्ष २०२० मध्ये ५८२ या नीचांकी पातळीवर पोहोचली.
मात्र, त्यानंतर पुन्हा वाढ सुरू झाली असून, गेल्या तीन वर्षांपासून प्रमाणपत्रांचा आकडा ८००च्या पुढेच आहे.गंजिपेठेत ५४ प्रमाणपत्रे गंजिपेठ अग्निशमन केंद्रातून २०१५ मध्ये ७७ आणि २०१६ मध्ये ७४ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. वर्ष २०२० मध्ये ही संख्या ३५ वर आली. यंदा या केंद्रातून ५४ प्रमाणपत्रे जारी झाली आहेत.
सक्करदऱ्यात पुन्हा वाढ सक्करदरा केंद्रातून २०१५ मध्ये १८० प्रमाणपत्रे देण्यात आली. २०२३ मध्ये १७० आणि २०२४ मध्ये १७४ प्रमाणपत्रे जारी झाली होती. २०२५ मध्ये ही संख्या ९८ वर घसरली. यंदा मात्र पुन्हा वाढ होऊन १२३ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
उच्च न्यायालयाने रात्री १० वाजल्यानंतर फटाके फोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात या वेळेचे काटेकोर पालन करणे प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे. रात्री १२ वाजल्यानंतर फटाके फोडल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत असतात. त्या कारवाईचा ताणही असणार आहे.
सुगतनगर केंद्रातून २०१५ मध्ये १४१ आणि वर्ष २०१६ मध्ये १५० प्रमाणपत्रे देण्यात आली होती. २०२० मध्ये हा आकडा ९३ झाला. यंदा ११० प्रमाणपत्रे जारी झाली आहेत. नरेंद्रनगर केंद्रातून २०१८ मध्ये सर्वाधिक १८५ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. २०२० मध्ये ही संख्या ६९ वर आली, त्यानंतर २०२५ मध्ये १०७ आणि यंदा १२८ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
लकडगंज केंद्रातून २०१५ मध्ये ८१ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. २०२४ मध्ये हा आकडा १३६, २०२५ मध्ये १५४ आणि यंदा १५७ वर पोहोचला आहे.






