विशेष म्हणजे 30 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयातही सुनावणीनंतर 12 सप्टेंबर 2025 रोजी अजयने स्वतःच याचिका…
काही वेळानंतर आईने फोन केला असता जवळच मित्रांसोबत गप्पागोष्टी करत असल्याची माहिती दिली. रात्री पावणेदहाच्या सुमारास घराजवळच अभिषेक आणि प्रकाश यांच्यात पुन्हा भांडण झाले.
राजकीय क्षेत्रात प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा विधानसभा निवडणुकीत मला यश मिळू शकले नाही. त्यामुळे पुढचा मार्ग कदाचित रहांगडाले यांनी स्वीकारला असावा, कोणी कोणत्या पक्षात राहावे, हा व्यक्तिगत विषय आहे.
कधी काळी विदर्भातील समग्र विकासाबद्दल कटिबद्धता असूनही अनेक उद्योजक पायाभूत सुविधा समाधानकारक नसल्याने येथे आपले उद्योगविश्व साकारण्यास उत्सूक नव्हते, असे फडणवीस म्हणाले.
नियमांमधून काही श्रेणींना सूट देण्यात आली आहे. ज्यात मिहान, एमआयडीसी कॉम्प्लेक्समधील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या स्टाफ बसेस, एसटी महामंडळाच्या बसेसचा समावेश आहे.
पीडितेच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्यालाही मारहाण केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सरू केला.
नवीन नागपूर हा देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसायिक केंद्र बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. नागपूरच्या आर्थिक नकाशावर हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे.
कुणाल राऊत यांनी आपला प्रभाव वाढवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर युवक काँग्रेसमधील गटबाजीही सार्वजनिक झाली.
नागपूरच्या महामेट्रोने जगातील सर्वात लांब 'डबल डेकर' पुल बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शहीद चौकाजवळील मोदी राखी भंडारजवळ त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली. या दरम्यान दुचाकीवर असलेले तिन्ही आरोपी त्यांच्या मदतीला आले. त्यांनी पिशवी उचलून शाकेरा यांच्याकडे दिली आणि निघून गेले.
इतवारी येथील कक्कड ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचला. त्याने कर्मचाऱ्यांना सोन्याचे ब्रेसलेट दाखविण्यास सांगितले. त्याने दोन ब्रेसलेट आवडल्याचे सांगून हातात घातले आणि दुकानदाराला बिल बनविण्यास सांगितले.
नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय कंत्राटदराने गळ्याला दोर लावतात आपले जीवन संपवले. आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव पीव्ही वर्मा असे आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण काय?
नागपूरच्या जयताला रोडवर एका धावत्या कारला अचानक आग लागली. वेळीच सावध झाल्याने हरीश पांडे आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचला. हा थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.