मुंबई : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात (Medical Education) राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात वैद्यकीय शिक्षण हिंदीमधून खुले करून दिल्यानंतर आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे, या निर्णयामुळं वैदीकीय शिक्षण क्षेत्रात (Medical Education) एक मोठे क्रांतीचे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे २०२३ पासून वैद्यकीय अभ्यास हा मराठी भाषेमधून शिकवला जाणार आहे. त्यामुळं वैदीकीय शिक्षण (Medical Education) मराठीतून घेणाऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. दरम्यान मराठी भाषेतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनवण्यासाठी मागील 2 महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी विविध तज्ञांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
[read_also content=”१ नोव्हेंबरला ट्रेलर तर १५ दिवसांनी पिक्चर दिसेल, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/the-trailer-will-be-released-on-november-and-the-picture-will-be-released-after-fifteen-days-bachu-kadu-339724.html”]
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचे शिक्षण देण्यासाठी एकूण 62 महाविद्यालये आहेत. त्यात 10,045 विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये सरकार आणि महापालिकेची 27, खासगी 20, अभिमत विद्यापीठ 12 तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 3 मेडिकल कॉलेजेस आहेत. विद्यार्थ्यांना मराठीतून वैद्यकीय शिक्षण हा संपूर्ण ऐच्छिक पर्याय असणार आहे. आता विद्यार्थी मराठी भाषेतून एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम शिकू शकतील. वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical Education) हिंदीतून (Hindi) उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश (Madhy Pradesh) सरकारचा निर्णय ताजा असतानाच, आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण (Marathi Medical Education) घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळं याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.






