पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

पुणे शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्सच्या बाबतीत पुणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीमेत सत्ताधारी नेत्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांना 'साहेब', 'दादा' आणि ‘भाऊ’ असे किताब देण्यात आले आहेत.
Shrinath Bhimale secures first place in 'Pune City Disfigurement Award
पुणे महापालिकेने ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर केले असून यामध्ये सत्ताधारी नेते आघाडी असल्याचे दिसून आले (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम

  • पुणे महापालिकेने जाहीर केले 'साहेब', 'दादा' आणि ‘भाऊ’ असे किताब

  • पहिला किताब हा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पटकावला

Pune Flex News : पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. शहर फ्लेक्समुक्त करण्यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेली ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम आता अनोख्या उपक्रमामुळे चर्चेत आली आहे. अनधिकृत फ्लेक्सविरोधात नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्सच्या बाबतीत सत्ताधारी भाजपचेच नेते अव्वल ठरले आहेत. यामध्ये पहिला क्रमांक थेट महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पटकावला आहे.

महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर २४ नोव्हेंबर २०२६ रोजी या पुरस्कारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. राजकीय व्यक्तींसाठी ‘माननीय’ आणि व्यावसायिक जाहिरातींसाठी ‘ब्रँड्स’ अशा दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. ‘माननीय’ श्रेणीत सर्वाधिक फ्लेक्स लावणाऱ्या नेत्यांना उपरोधिक शैलीत ‘साहेब’, ‘दादा’ आणि ‘भाऊ’ असे किताब देण्यात आले आहेत.

भिमालेंना ‘साहेब’, सुतारांना ‘दादा’

‘माननीय’ श्रेणीत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ यशवंत भिमाले यांना ‘साहेब’ हा किताब देण्यात आला आहे. त्यांचे फ्लेक्स संपूर्ण शहरात झळकत असल्याचा उल्लेख यादीत करण्यात आला आहे. नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांना ‘दादा’ हा किताब मिळाला असून, त्यांचे फ्लेक्स प्रत्येक चौकात दिसत असल्याची टिप्पणी करण्यात आली आहे. तर सुनील नामदेव पांडे यांना ‘भाऊ’ हा किताब देण्यात आला आहे. त्यांचे फ्लेक्स गल्लीबोळांतही पोहोचल्याचे यादीत नमूद केले आहे.

पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'

विशेष म्हणजे, श्रीनाथ भिमाले हे शहराच्या विकासकामांसह आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शहरात सर्वाधिक फ्लेक्स लावणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

व्यावसायिक जाहिरातींनाही पुरस्कार

महापालिकेने व्यावसायिक जाहिरातींचाही या उपरोधिक पुरस्कार योजनेत समावेश केला आहे. यामध्ये ब्रह्म प्रिया वर्ल्ड स्कूलला ‘फुकट जाहिरात प्रीमियम’, आरजीज बिर्याणी स्टोरीला ‘फुकट जाहिरात प्रो’, तर शांती शिखरला ‘फुकट जाहिरात’ या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

वाढदिवशी मिळाली अनोखी भेट!

योगायोग म्हणजे, २५ नोव्हेंबर रोजी श्रीनाथ भिमाले यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने शहरात त्यांच्या वाढदिवसाचे बॅनरही झळकले आहेत. अशातच महापालिकेने जाहीर केलेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्यासाठी वाढदिवसाची एक अनोखी भेटच ठरली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने या मोहिमेतून शहराच्या सौंदर्यीकरणाच्या बाबतीत कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय पद, पक्ष किंवा प्रभावाचा विचार न करता अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांना सार्वजनिकरीत्या अधोरेखित करण्याच्या या उपक्रमाची शहरात चर्चा सुरू आहे.

Q

पुणे महापालिकेने ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ का जाहीर केले आहेत?

A

पुणे शहर फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिकेने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम सुरू केली आहे. शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करणाऱ्यांना उपरोधिक पद्धतीने अधोरेखित करण्यासाठी महापालिकेने ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर केले आहेत.

Q

पुणे महापालिकेच्या ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ मध्ये कोणाला कोणता किताब मिळाला आहे?

A

या पुरस्कारांमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांना ‘दादा’, तर सुनील पांडे यांना ‘भाऊ’ हा किताब देण्यात आला आहे.

Q

‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ मध्ये व्यावसायिक जाहिरातींचाही समावेश आहे का?

A

महापालिकेने राजकीय व्यक्तींसोबतच व्यावसायिक जाहिरातींचाही या उपक्रमात समावेश केला आहे. यामध्ये ब्रह्म प्रिया वर्ल्ड स्कूल, आरजीज बिर्याणी स्टोरी आणि शांती शिखर यांना विविध श्रेणींमध्ये स्थान देण्यात आले आहे.