पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'

पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये मंदार किवळे या कात्रज प्रकरणातील आरोपीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून यावर पुण्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Pune Gardian minister Sunetra Pawar first reaction on Shivajinagar pune crime case
शिवाजीनगर हल्ला प्रकरणावर पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • शिवाजीनगर परिसरामध्ये मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला

  • पुणे हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया

  • पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर दिला जाणार भर

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर परिसरामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळे या आरोपीची हत्या करण्यात आली आहे. यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून यामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाजीनगर भागातील गोळीबार व हल्ला झालेल्या घटनेवर सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.

हा हल्ला झाल्यानंतर पुण्यातील कायदा व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही पोलीस प्रशासन व गृह खात्यावर नाराजी व्यक्त केली. पुण्यातील सुरक्षेबाबत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर भर दिला जाईल. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

पुणे हादरलं! न्यायालयाबाहेर बंदूक फेकून हल्लेखोर पसार; मंदार किवळेवरील हल्ल्यामागे कात्रजमधील हत्येची इनसाईड स्टोरी!

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर आज (दि. २५ नोव्हेंबर २०२६) भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यामागे कात्रजमधील जुन्या हत्याकांडाचे खळबळजनक कनेक्शन समोर आले आहे. या हल्ल्यात लक्ष्य झालेला मंदार मारुती किवळे हा कात्रज येथील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, तो अवघ्या चार दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. 

'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

Q

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर नेमकी काय घटना घडली?

A

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर मंदार किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला.

Q

शिवाजीनगर येथे हल्ला झालेला मंदार किवळे कोण आहे?

A

मंदार किवळे हा कात्रजमधील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. या जुन्या हत्याकांडाशी त्याच्या संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

Q

पुण्यातील शिवाजीनगर हल्ला प्रकरणावर सुनेत्रा पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली?

A

सुनेत्रा पवार यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याचे म्हटले आहे. आरोपींचा शोध सुरू असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.