जवाहर नवोदय प्रवेशाचा 'सातारा पॅटर्न'! ११ हजार परीक्षार्थींमधून झेडपीच्या मुलांनी उमटवला ठसा
या विद्याध्थ्यांना क्षेत्रमाहली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. हे संपूर्ण शिक्षण विद्याथ्यांना मोफत उपलब्ध होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नव्याने सुरू केलेले पाचवीचे वर्ग, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम, गुणवत्ता वाढ़ीसाठी राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, नियमित सराव, प्रश्न पेढ़ी निर्मिती यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील मुलांनी हे यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्यांचे जि. प. अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले व सदस्यांनी अभिनंदन केले.
राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी,यासाठी शिक्षणाधिकारी नायकवडी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांची कामगिरी चमकदार होत आहे. नवोदय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी नायकवडी यांनी जिल्ह्यात विशेष शैक्षणिक उपक्रम राबवल्याने शिक्षण विभागाला हे यश मिळाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी शिक्षणाधिकारी नायकवडी यांचे विशेष कौतुक केले.






