PM Kisan Yojana: 'पीएम किसान' लाभासाठी पायपीट, ई-केवायसी पूर्ण, अनुदान जमा होईना; वाशिम जिल्ह्यात सहाही तालुक्यांत नाराजी

Washim PM Kisan Yojana Pending Installment: ई-केवायसी पूर्ण करूनही वाशिममधील अनेक शेतकऱ्यांचे पीएम किसानचे हप्ते रखडले आहेत. पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी विभागात पायपीट सुरू आहे.
Photo - Ai Generated
Washim PM Kisan Yojana Pending InstallmentWashim PM Kisan Yojana Pending Installment
Published on: 
Updated on: 
  • ई-केवायसी करूनही पदरी निराशाच

  • पीएम किसानच्या पैशांसाठी शेतकऱ्यांच्या चकरा

  • वाशिममधील शेतकरी हप्त्यांच्या प्रतीक्षेत

वाशिम: पीएम किसानच्या लाभासाठी शेतकऱ्यांची कृषी विभागात पायपीट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा, कृषी विभागात चकरा वर चकरा माराव्या लागत आहे.जिल्ह्यातील सहाही तालुक्यात वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड, मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी लागते.

मात्र, शासनाच्या निकषानुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कुणाचे दोन तर कुणाचे तीन हप्ते रखडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि शेतीच्या हंगामात बियाणे, खते तसेच इतर आवश्यक खर्चासाठी मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते.

Photo - Ai Generated
नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा

यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

काही लाभार्थ्यांना दोन हप्त्यांची तर काहींना तीन हप्त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांची निराशा वाढत आहे. आधीच पिकांची देखभाल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता अशा अनेक समस्यांशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासकीय योजनेचे मिळविण्यासाठीही हेलपाटे मारावे लागत पैसे आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.

वाशिम सुरकंडीचे, किसन ईरतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मात्र, पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतक-यांची संख्या - निश्चित करून त्यांच्या अर्जामधील त्रुटीची तपासणी करावी. हप्ते न मिळालेल्या लाभार्थ्यांना त्वरीत लाभ मिळावा यासाठी शासनाने वेळीच कार्यवाही करावी अशीम मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ई-केवायसी पूर्ण, पण प्रक्रियेचा उपयोग काय ?

अनेक शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग, ई- केवायसी आणि बँक खात्याशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सम्मान निधि तरीदेखील त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी दाखविल्या जात आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये जमीन अभिलेख, आधार पडताळणी, बँक खाते किंवा लाभार्थी माहितीशी संबंधित अडचणी असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून वारंवार ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, ई-केवायसी झाल्यानंतरही हप्ते जमा होत नसतील, तर या प्रक्रियेचा उपयोग काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Photo - Ai Generated
रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला