वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात ट्रकजवळ 45–50 वर्षीय महिलेचा भयानक अवस्थेत मृतदेह आढळला. डोकं दगडाने ठेचलेलं असून कपडे अस्ताव्यस्त होते. हत्या व लैंगिक अत्याचाराचा संशय; मृत महिलेची ओळख अद्याप अस्पष्ट.
झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय ‘कब-बुलबुल’ उत्सव मंगळवारी (दि. ३०) उत्साहात पार पडला. या उत्सवात तालुक्यातील विविध शाळांमधील १४० हून अधिक कब-बुलबुल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थिनींनी अबला न राहता आत्मविश्वासाने सबल बनावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख जयंती समारोप कार्यक्रमात त्यांनी शिस्त, सद्वर्तन, आत्मसंरक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
विदर्भ साहित्य संघ व स्व. सीमा शेटे स्मृतीस समर्पित अकोल्यातील ‘कवी कट्टा’ लेखिका संमेलनासाठी कामरगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद विद्यालयातील १२ विद्यार्थिनींची निवड झाली.
वाशिम जिल्ह्यातील पोकरा भाग-१ योजनेत लाखो रुपयांच्या गैरप्रकाराचा आरोप करत शेतकरी वसंत खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३३ पानांची पुराव्यासहित तक्रार दाखल केली आहे.
अनसिंग ग्रामपंचायतीतील गंभीर आर्थिक व प्रशासकीय गैरप्रकारप्रकरणी तत्कालीन सरपंच संतोष खंडारे यांची सरपंचपद व सदस्यत्व अपात्रता मंत्रीस्तरीय न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही कायम ठेवली आहे.
शेतकरी हिताच्या योजना प्रत्यक्षात वेळेत व पारदर्शकपणे राबवून कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
वाशिम जिल्ह्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली.
नागरिकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचे आवाहन नीती आयोगाचे जिल्हा प्रभारी अधिकारी मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांनी केले.
जिल्ह्यात हलक्या थंडीची चाहूल लागताच युरोप, सायबेरिया आदी देशांतून स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून विविध तलावांवर त्यांच्या हजेरीत हळूहळू वाढ दिसत आहे.
वाशीमच्या सवासनी गावात घरगुती वादानंतर पत्नीने विहिरीत उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पतीनेही उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावात शोककळा पसरली.