गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या विधानावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पंचनामे सरसकट व्हावेत आणि कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.
Purandar News: जमीनीची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांचे गट करून त्यांच्याशी मागणी व मोबदला याबाबत चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्रिपदाचे वर्षभराचे वेतन रक्कम रुपये 31 लक्ष 18 हजार 286 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतल्याचे पाहायला मिळाले.
PM Kisan Yojana 21st Installment : शेतकऱ्यांसाठी पुढील हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर पैसे येतील की नाही हे तुम्ही कसे शोधू शकता…
तासगाव तालुका आणि परिसरातील द्राक्षबागांवर यंदाच्या अनियमित आणि सततच्या पावसाचे सावट पसरले आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता ऑक्टोबर महिन्यातही कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करुन घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
शेतकरी प्रश्नावर अमित शाह एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व करणारेही मूग गिळून गप्प बसले हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा घोर अपमान असल्याचा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
सरकारने ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.
कर्जत तालुक्यातील २०८ गावांमधील भाताच्या शेतीचे पंचनामे करण्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कृषी,महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर पोहचले आहेत.