रोजगारासाठी परजिल्ह्यात धाव! एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त

शेतीचा हातचा पैसा संपल्याने तरुणांना आता रोजगारासाठी बाहेर पडावे लागत आहे. मात्र जिल्ह्यात दोन, चार वगळता मोठे उद्योग केंद्र नसल्याने बाहेरील जिल्ह्याचा आसरा घ्यावा लागत आहे. काही तरुण बांधकाम, खाजगी कंपन्या, कारखाने, हॉटेल व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी स्थलांतर करतात.
एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त
एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त
Published on: 
Updated on: 

शेतीप्रधान म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यातही अकुशल रोजगारांसाठी मोठे उद्योगच नसल्याने मिळेल ते काम करूनच आपली उपजीविका भागवावी लागते. यावर्षी नापिकी, दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतून मिळणारे अपुरे उत्पन्न यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना आता शेजारील जिल्ह्यात रोजगारासाठी आसरा घ्यावा लागत आहे. रोजगाराच्या शोधात ग्रामीण तरुणांची वर्धा, देवळी, नागपूर, अमरावती येथे सुरू असलेली धावपळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा प्रश्न ऐरणीवर आणत आहे.

एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त
Amravati News: रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती! पाणी, खर्चाच्या गणिताने बदलली पीक निवड

जिल्ह्यात रेमंड हा एकमेव मोठा उद्योग आहे. तसेच त्यानंतर दोन चार सुतगिरण्या व साखर कारखाने येथे मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल मनुष्यबळ आहे. या व्यक्तीरिक्त रोजगाराचा सर्व भार लघु व मध्यम उद्योगावरच आहे. २०२४-२५ नुसार १२ हजार १०८ सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग सुरू आहेत. यातून जवळपास ७१ हजार ६६४ जणांना रोजगार मिळाला आहे. यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ८० उद्योग असून त्यातून ३४ हजार ९०० जणांना त्याखालोखाल पुसद तालुक्यात एक हजार ९२ उद्योगांतून ५ हजार ५६३ जणांना, तर वणी तालुक्यात ९३५ उद्योगांतून ५ हजार ६९५ जणांना रोजगार मिळत आहे. ही आकडेवारी जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराच्या तुलनेत उद्योगांचे वितरण आणि रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याचेही दिसून येते. जिल्ह्यातील बहुतांश भाग हा ग्रामीणमध्ये येतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. उत्पादन खर्च आणि शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.

तरुणांची देवळी, वर्धा, नागपूरला पसंती

ग्रामीण भागात अकुशल मंजुरांची प्रचंड संख्या आहे. सध्या शेतीची कामे संपल्याने पाच ते सहा महिने रोजगारासाठी वर्धा, देवळी, नागपूर या जिल्ह्यात जात आहेत. नागपुरात हॉटेल व्यावसायात अनेक तरुण आहेत, तर देवळी येथील स्टील प्लांटमध्येही नजीकच्या कळंब, राळेगाव येथील तरुण रोजगारानिमित्त येथे जात आहे.

एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त
Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

बांधकाम, कारखाने, हॉटेलकडे कल

शेतीचा हातचा पैसा संपल्याने तरुणांना आता रोजगारासाठी बाहेर पडावे लागत आहे. मात्र जिल्ह्यात दोन, चार वगळता मोठे उद्योग केंद्र नसल्याने बाहेरील जिल्ह्याचा आसरा घ्यावा लागत आहे. काही तरुण बांधकाम, खाजगी कंपन्या, कारखाने, हॉटेल व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी स्थलांतर करतात. या स्थलांतरामुळे कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. कमी वेतनात काम करणे, राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च पेलणे, अशा अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो.