आदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
युवतीसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडल्याने एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे.
एकाच दिवशी दोन खुणांच्या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरलं आहे. पहिली हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर दुसरी घटना संशयाच्या रागात पतीने पत्नीची हत्या केली.
Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले असून मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारले. धक्कादायक बाब म्हणजे मदतीला अल्पवयीन विद्यार्थी घेतले.
दोन वेगवेगळ्या दुचाकीच्या दुर्दैवी घटना घडल्या आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक अपघात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झाला, तर दुसरा अपघात ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झाला.
यवतमाळ जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरु आहे. गेल्या चार महिन्यात खुनाच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. आता यवतमाळ शहरात एकाच दिवशी हत्या झाल्याने संपून शहर हादरलं आहे.
कर्जमाफी करु असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.
यवतमाळमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असा संदेश दिला. या कार्यक्रमात तब्बल 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याद्वारे केले गेले. विशेष म्हणजे हे राज्यातील पहिलेच अत्याधुनिक मॅाड्युलर थिएटर आहे.
भाजप आमदार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मराठवाडा व विदर्भामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सोबत थिरकत…
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ३ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री आणि आज सकाळी पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने…
यवतमाळच्या बाेरगाव पुंजी गावात एका बोगस डॉक्टराने त्याचा दवाखाना सुरु केला होता. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मिथुन बिस्वास या बोगस डॉक्टराच्या दवाखान्यावर छापा टाकला. पोलिसांनी बोगस डॉक्टर मिथुन बिस्वास…
दिवसभराचे काम आटपून घरी परत जात असताना दोन तरुणांचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोहरादेवीचे दर्शन आटोपून तेलंगणातील कुटुंब परतीच्या मार्गाने जात असताना नांदेडकडून उमरखेडकडे येणाऱ्या भरधाव महिंद्रा कारच्या धडकेत टाटा एसचा चुराडा झाला. या अपघात अकरा भाविक गंभीर जखमी झाले.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून विशेष तयारी केली जात आहे. त्यानुसार, प्रचारसभाही घेतल्या जात आहेत. त्यात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी…