Amravati News: रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती! पाणी, खर्चाच्या गणिताने बदलली पीक निवड

Amravati News: तेलवर्गीय पिकांच्या पारंपरिक क्षेत्रात बदल होऊन मका आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील मागणी या घटकांचा विचार करून शेतकरी पीक निवडीला प्राधान्य देत आहेत.
रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती!
रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती!
Published on: 
Updated on: 

उन्हाळी धानाच्या लागवडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात पीक पद्धतीत बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. वाढता उत्पादन खर्च, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता शेतकरी उन्हाळी धानाऐवजी मका लागवडीला प्राधान्य देत आहेत. कमी कालावधीत येणारे, तुलनेने कमी खर्चाचे आणि काढणीनंतर दुसरे पीक घेण्याची संधी उपलब्ध करून देणारे मका पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरत आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील उन्हाळी धानाचे क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती!
अमरावती विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा; आता केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

भंडारा, पवनी, लाखनी, साकोली, तुमसर आणि मोहाडी तालुक्यांतील शेतकऱ्यांचा मक्याच्या लागवडीकडे कल वाढत असल्याचे चित्र आहे. पारंपरिक उन्हाळी धान, गहू आणि हरभरा या पिकांऐवजी मका लागवडीचा पर्याय शेतकरी गांभीर्याने विचारात घेत आहेत. तुलनेने कमी श्रम, मर्यादित भांडवल आणि कमी कालावधीत उत्पादन मिळण्याची शक्यता ही या पिकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मका काढणीनंतर शेत रिकामे होत असल्याने पुढील हंगामातील पीक घेण्याचे नियोजन करणेही शक्य होते. जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून बदल होत आहे. तेलवर्गीय पिकांच्या पारंपरिक क्षेत्रात बदल होऊन मका आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील मागणी या घटकांचा विचार करून शेतकरी पीक निवडीला प्राधान्य देत आहेत.

शेतीला नवी दिशा

यंदाच्या रब्बी हंगामात मक्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम उन्हाळी धानाच्या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारभावातील चढ-उतार, उत्पादनासाठी येणारा खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारे उत्पन्न यांचा विचार करूनच शेतकऱ्यांना पीक नियोजन करावे लागणार आहे. मक्याच्या लागवडीला मिळणारे वाढते प्राधान्य केवळ यंदाच्या हंगामापुरते मर्यादित न राहता भविष्यात भंडारा जिल्ह्यातील शेतीच्या पीक रचनेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते.

रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती!
Amravati News: कोसा रेशीम उद्योगाला दुष्काळाच्या झळा! टसर उद्योगाला ६० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचा अंदाज

पोल्ट्री उद्योगामुळे मक्याला मागणी

मक्याचा वापर प्रामुख्याने कुक्कुटपालनासाठी खाद्य तयार करण्यासह विविध उद्योगांमध्ये केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत वर्षभर या पिकाला मागणी असते. देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच विविध राज्यांमध्येही मक्याची खरेदी-विक्री केली जाते. मागील वर्षी खासगी बाजारपेठेत मक्याला प्रतिक्विंटल २ हजार ५० रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये या पिकाबाबत आशादायी चित्र निर्माण झाले. त्यातच केंद्र सरकारने यंदासाठी मक्याचा किमान आधारभूत दर प्रतिक्विंटल २ हजार २२५ रुपये निश्चित केल्याने मक्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे. मक्यापासून धान्याबरोबरच जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या पिकातून दुहेरी फायदा मिळू शकतो. उन्हाळी धानाच्या लागवडीसाठी आवश्यक असणारे पाणी आणि त्यासाठी येणारा वाढता खर्च लक्षात घेता मका हा तुलनेने व्यवहार्य पर्याय ठरत आहे.