

अभिनेत्री राशी खन्नाचा 'अरनमानाई 4' हा तमिळ चित्रपट उद्योगात बॉक्स ऑफिसवर सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असून, 2024 मध्ये तमिळ चित्रपट उद्योगातील पहिला हिट चित्रपट म्हणून उदयास आला आहे. कोणकोणते चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताय हे जाणून घेऊ या !
मंजुम्मेल बॉईज - या चित्रपटाने हा सर्व्हायव्हल थ्रिलर बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला पार करणारा हा पहिला मल्याळम चित्रपट म्हणून ठरला आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला चित्रपटगृहात प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
द गोट लाइफ - पृथ्वीराज सुकुमारन स्टारर या चित्रपटाने 150 कोटींचा गल्ला पार केला आहे. हा चित्रपट एका मल्याळी स्थलांतरित मजुराभोवती फिरत आहे, ज्याला अनेक भारतीयांपैकी मूळ अरबांनी वाळवंटातील निर्जन शेतात शेळ्यापालक म्हणून सौदी अरेबियामध्ये गुलाम म्हणून भाग पाडले जात आहे.
या चित्रपटांव्यतिरिक्त मल्याळमधील 'आवेशम' आणि 'प्रेमालू' या सिनेमानिसुद्धा 100 कोटींहून जास्त गल्ला बॉक्सऑफिस केला आहे. या दोन चित्रपटांनी अधिक कलेक्शन करून लोकांचे प्रेम मिळवले आहे.
कॅप्टन मिलर- अभिनेता धनुषने या तमिळ चित्रपट अत्यंत उत्कृष्ट काम केले असून, या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 104.79 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रेक्षकांचे धनुषवरील प्रेम आणि त्यांनी साकारलेली भूमिका ही प्रेक्षकांना भरपूर आवडली असून या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
तसेच 'अरनामनाई 4' या तामिळ चित्रपटात तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना या वर्षी एकत्र भूमिकेत काम करताना दिसत आहे. या चित्रपटानेसुद्धा जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा पहिला महिला नेतृत्वाचा चित्रपट ठरला आहे. या हॉरर-कॉमेडीच्या यशाने तमन्नाचे स्थान हिटमेकर म्हणून प्रस्थापित केले आहे. आणि राशीला अष्टपैलू पॉवरहाऊस असल्याचे सिद्ध केले आहे.
आता हा चित्रपट 31 मे रोजी हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी सज्ज आहेत. त्याआधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे हिंदीत अनावरण केले आहे. दोन उत्तम कलाकारांच्या चाहत्यांचा अप्रतिम प्रतिसाद आणि हॉरर-कॉमेडी चित्रपट 2024 मधील पहिला तमिळ हिट म्हणून उदयास आला आहे. तसेच या चित्रपटमध्ये सुंदर सी, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश, कोवई सरला आणि इतरही अभिनेते प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.
हनु-मन आणि गुंटूर कारम- तेलुगू इंडस्ट्रीमध्ये बॉक्स ऑफिसवर हाहाकार माजवणारे दोन प्रचंड रिलीज झाले. तेजा सज्जा अभिनीत 'हनु-मन' आणि महेश बाबूच्या 'गुंटूर कारम'ने जगभरात अनुक्रमे 350 कोटी आणि 171.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अतिशय चमत्कारिक भाग असून ते प्रेक्षकांना आवडे आहे.
आता या इंडस्ट्रीत कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री हे विक्रम मोडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.