Indias Best Dancer
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील (Sony Entertainment Television) ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (Indias Best Dancer) या डान्स रिॲलिटी शोच्या पहिल्या सत्राच्या घवघवीत यशानंतर सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वात ‘बेस्ट का नेक्स्ट अवतार’ शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातील स्पर्धकांनी शोमधील एन्ट (एन्टरटेन्मेंट, न्यूनेस आणि टेकनिक) स्पेशालिस्ट- मलाईका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या परीक्षकांना आपल्या दमदार मूव्ह्ज आणि खास डान्स ॲक्टनं प्रभावित केल्यानंतर इंडियाज बेस्ट डान्सरच्या दुसर्या सत्राला आता ‘बेस्ट फाईव्ह’ (Best Five) स्पर्धक सापडले आहेत.
इंडियाज बेस्ट डान्सर हे बिरुद मिळवण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकणारे हे पाच स्पर्धक आहेत गौरव सरवन व त्याचा कोरिओग्राफर रूपेश सोनी, सौम्या कांबळे व कोरिओग्राफर वर्तिका झा, झमरूध व त्याची कोरिओग्राफर सोनाली कर, रोझा राणा व कोरिओग्राफर सनम जोहर आणि रक्तिम ठाकुरिया व कोरिओग्राफर आर्यन पात्रा… पॉपिंग, ॲनिमेशन आणि लॉकिंग शैलीसाठी प्रसिद्ध असलेला जयपूरचा गौरव सरवन वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून डान्स करत असून, आता स्वतःची डान्स अकादमी चालवत आहे. आपल्या असामान्य डान्स मूव्ह्जच्या मदतीनं त्यानं वारंवार परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पुण्याच्या सौम्या कांबळेच्या बेली डान्सिंगला तर तोडच नाही. उत्कृष्ट बेली डान्सर आणि फ्रीस्टाइल डान्सर सौम्यानं कौशल्याबाबत कुठलीही तडजोड न करता त्या दोघांच्या इच्छेचा मान राखला आहे. ओदिशाच्या रोझा राणानं बॉलीवूड, फ्रीस्टाइल आणि ओपन स्टाइल या प्रत्येक भागात स्वतःला सिद्ध केलं आहे. आसामचा रक्तिम ठाकुरिया फक्त त्याच्या ओपन स्टाइल कोरिओग्राफीबद्दलच नाही तर रोमँटिक नसण्याबद्दल ओळखला जातो. त्याच्या अनेक महिला चाहत्या आहेत. रक्तिम अगदी सुरुवातीपासूनच या शोमध्ये झळकला आहे.