

अमिर खान प्रोडक्शन : दर्शिल सफारी ने 2007 मध्ये आलेल्या 'तारे जमीं पर' चित्रपटात ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती. अजूनही लोक त्याला ईशान अवस्थीच्या नावानेच ओळखतात. या चित्रपटामुळे दर्शिल आवडता बालकलाकार म्हणून तो खूप प्रसिद्ध झाला. चित्रपटात त्याची व्यक्तिरेखा एका डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या मुलाची होती. अमिर खानच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटासाठी ईशानने दिलेल्या पहिल्या ऑडिशन टेस्टचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ईशानचा अभिनय पाहिल्यानंतर, तुम्ही पुन्हा एकदा 'तारे जमीं पर'च्या या छोट्या सुपरस्टारच्या प्रेमात पडाल.
हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शिन आणि निर्मीत अमिर खानने केली होती. या चित्रपटात छोटा ईशान अवस्थी म्हणजेच दर्शील सफारी याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता आमिर खान प्रॉडक्शनने दर्शिल सफारीचा फर्स्ट लुक टेस्ट व्हिडिओ रिलीज केला आहे. या क्लिपमध्ये दर्शिलने चित्रपटातील एका शॉटचे ऑडिशन दिल्याचे दिसत आहे.
अमिर खानने दर्शिल सफारीचे कौतुक केले
या ऑडिशन व्हिडिओमध्ये अमिर खान दर्शिलचे कौतुक करताना दिसत आहे. तो म्हणतो – “जेव्हा त्याने दर्शिलचा पहिली ऑडिशन टेस्टची झलक पाहली, त्याने एकही डायलॉग बोलला नव्हता, पण त्याचा चेहरा आणि डोळे पाहताच, त्याला समजले की हा त्याचा ईशान अवस्थी आहे.” लोकांनी या व्हिडिओचे खूप कौतुक केले आहे. या चित्रपटात दर्शिलने डिस्लेक्सिया झालेल्या मुलाची भूमिका साकारली होती.
'दर्शिलने आपल्या अभिनयाने खूप रडवले'
एका नेटकरी म्हणाला- ‘”दर्शिलने ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावली.” तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, “दर्शिलने आपल्या अभिनयाने आपल्याला खूप रडवले.” त्याच्या आणखी एका चाहत्याने “या चित्रपटासाठी आमिर खानने कॅमेऱ्यासमोर जितकी मेहनत केली होती त्यापेक्षा जास्त मेहनत कॅमेऱ्याच्या मागे केली आहे” अशी कमेंट केली आहे. तर अजून एकाने “हा चित्रपट माझ्या लहानपणीची आठवण आहे.” असे म्हटले आहे.
अमिर खान 16 वर्षांनंतर बनवणार 'सितारे जमीन पर'
‘तारे जमीं पर’ या चित्रपटाला 81 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी भारताकडून प्रवेश मिळाला आहे. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अमिर खान आता 16 वर्षांनंतर 'सितारे जमीन पर' हा चित्रपट बनवणार आहे, जो डाऊन सिंड्रोमवर आधारित असेल.