amitabh bachchan at football match
बॉलिवूड बिग बी अर्थातच अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असूनही आजही फिट आहेत. अमिताभ बच्चन अजूनही पडद्यावर आणि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी (Lionel Messi), ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), नेमार आणि एम्बाप्पे यांना भेटत असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सौदी अरेबियातील रियाधमध्ये सुरु असलेल्या पीएसजी आणि सौदी ऑल स्टार इलेव्हन सामन्यात अमिताभ बच्चन यांनी खास उपस्थित लावली होती. हे सामने फहद आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु आहेत. या सामन्याच्या काही वेळ आधी अमिताभ बच्चन यांनी मैदानावर जाऊन सर्व खेळाडूंची भेट घेतली. हा व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांना खेळाची आवड आहे. अनेकदा ते खेळाडूंचे कौतुक करताना दिसतात. यावेळी बिग बी चक्क फुटबॉलच्या मैदानावर उतरले आहेत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची भेट घेतली.
ब्राझीलचा रोनाल्डो आणि पॅरिस सेंट जर्मेन (PNG)चा लिओनेल मेस्सी आमनेसामने होते. अमिताभ बच्चनही कार्यक्रमात दिसले. हा सामना पाहण्यासाठी त्यांना सौदी अरेबियात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.
बिग-बींनी ब्राझीलच्या नेमार जूनियर आणि तरुण फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे यांच्याशीदेखील हात मिळवला. यानंतर त्यांनी लिओनेल मेस्सीची देखील भेट घेतली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन मेस्सीशी हस्तांदोलन केल्यानंतर काही सेकंद बोलल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.अमिताभ बच्चन मेस्सीचे फुटबॉलचा विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन करत असल्याचे म्हटले जात आहे.