(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला पुन्हा एकदा भावनिक आठवणीतून उजाळा दिला आहे. सोशल मीडियावर तिने सुशांतसोबत दांडिया खेळतानाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला असून, तो पाहून सध्या चाहतेही भावूक झाले आहेत.
त्रिशा ठोसरने तोडला कमल हसनचा रेकॉर्ड! अभिनेत्याने स्वतः व्हिडीओ कॉलवर दिल्या शुभेच्छा
अंकिता आणि सुशांत यांचे एकेकाळी अतिशय जवळचे नाते होते. दोघांची जोडी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती. हा व्हिडिओ आधी बालाजी टेलीफिल्म्सच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला होता, जो अंकिताने री-शेअर केला. जरी तिने या क्लिपवर काहीही लिहिलं नसलं, तरी चाहत्यांना हा व्हिडिओ पाहून भावनिक आठवणींचा प्रवास झाला. पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिता आणि सुशांत यांनी अनुक्रमे अर्चना आणि मानव ही पात्रं साकारली होती. ही जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. याच शोदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या सात वर्षांच्या नात्याची सुरुवात झाली. मात्र, काही वर्षांनी ते वेगळे झाले. त्यानंतर अंकिताने 2021 मध्ये विकी जैनशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरूवात केली.
2024 मध्ये जेव्हा‘पवित्र रिश्ता’ला १५ वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी अंकिताने एक भावनिक पोस्ट करत सुशांतविषयी लिहिलं होतं:
ती म्हणाली होती की, “शो सुरू करताना मला अभिनयाचा फारसा अनुभव नव्हता. सुशांतने प्रत्येक टप्प्यावर मला मार्गदर्शन केलं. त्याच्या मदतीसाठी मी नेहमीच ऋणी राहीन.”तिने हेही लिहिलं की,“अर्चना माझ्यात होती, आहे… आणि कायम राहील. या पात्राने मला खूप काही शिकवलं.” अंकिताला पवित्र रिश्ता’ मालिकेत अर्चना या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि तिचं नाव घराघरात पोहोचल. सध्या अंकिता सोशल मीडियावरही सक्रिय असून, ती अनेक जाहिराती, वेब सिरीज आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहे.
सुशांत सिंह राजपूतचे जून २०२० मध्ये निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुशांतची कामगिरी आणि व्यक्तिमत्त्व अनेकांना प्रेरणा देणारी होती, आणि त्याच्या अचानक जाण्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला.