(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या ‘धुरंधर 2’ ची सर्वत्र चर्चा असून आता आता साऊथ मधील प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी प्रभाससोबत ‘धुरंधर 2’ पाहिली आणि त्यावर सोशल मीडियावर आपले विचार व्यक्त केले, ज्यामुळे प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. रिव्ह्यूने सर्वांचे लक्ष वेधले असले, तरी आदित्य धर यांचे उत्तर विशेष ठरले, विशेषतः त्यांनी प्रभास “लेजेंड” म्हटले आहे, दिग्दर्शकाने अभिनेत्याला ‘लेजेंड’ म्हणणे ही केवळ साधी स्तुती नसून, आज चित्रपटसृष्टीत प्रभासबद्दल वाढत असलेल्या आदर आणि दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
प्रभास यांना आज कोणताही संशय न ठेवता निर्विवाद पॅन-इंडिया सुपरस्टार मानले जाते आणि चित्रपटसृष्टीत त्यांचेच वर्चस्व पाहायला मिळते. अलीकडेच दिग्दर्शक आदित्य धरने अभिनेत्याला “लेजेंड” असे संबोधले, ज्यामुळे प्रभासबाबतची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. ही प्रतिक्रिया संदीप रेड्डी वांगा यांनी ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर दिलेल्या रिव्ह्यूला उत्तर देताना आली होती, ज्यामुळे चित्रपटासह प्रभासच्या व्यक्तिमत्त्वाकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले.
या आठवड्याच्या सुरुवातीला वांगा यांनी प्रभाससोबत ‘धुरंधर 2’ पाहून सोशल मीडियावर आपले विचार मांडले, ज्यामुळे प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या. रिव्ह्यू चर्चेत आला असला तरी आदित्य धर यांचे उत्तर विशेष ठरले, विशेषतः त्यांनी प्रभाससाठी वापरलेला “लेजेंड” हा शब्द. ही केवळ साधी स्तुती नसून, चित्रपटसृष्टीत त्यांच्या वाढत्या मान-सन्मानाचे प्रतीक मानले जात आहे.
Randeep Hooda ने लेकीची पहिली झलक शेअर करत नाव केलं जाहीर, नावामागचा खास अर्थ चर्चेत
प्रभास यांनी स्वतःला पॅन-इंडिया सुपरस्टार म्हणून भक्कमपणे स्थापित केले आहे. बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर यशापासून ते आगामी मोठ्या बजेटच्या प्रोजेक्ट्सपर्यंत त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी वेगाने ₹100 कोटी क्लब गाठला असून, थिएटरमध्ये त्यांची जबरदस्त पकड असल्याचे यातून स्पष्ट दिसून येत आहे.
विविध भाषांमधील मोठ्या चित्रपटांचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता पॅन-इंडिया बॉक्स ऑफिसच्या बदलत्या चित्रात महत्त्वाची ठरली आहे. आता अभिनेता पुढे ‘स्पिरिट’, ‘फौजी’, ’कल्की 2′ आणि ‘सालार 2’ यांसारख्या त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, ज्यामुळे त्यांच्या भव्य स्क्रीन उपस्थितीला आणखी उंची मिळण्याची अपेक्षा आहे.






