(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडची सौंदर्यवती आणि जागतिक फॅशन आयकॉन ऐश्वर्या राय बच्चन हिने पुन्हा एकदा आपल्या अदाकारी आणि स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पॅरिस फॅशन वीक २०२५मध्ये तिने डिझायनर मनीष मल्होत्राच्या अँड्रोजिनस शेरवानी लूकमध्ये वॉक करताना ग्लॅमरचा नवा टप्पा गाठला. तिच्या या आकर्षक लूक आणि दिलखेचक अदांनी तिने पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पॅरिसफॅशन वीकमध्ये मैफिल लुटली आहे.
बहुप्रतिक्षित ‘तुंबाड २’ चित्रपटात झळकणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!
ऐश्वर्याने परिधान केलेला पोशाख इंडिगो रंगाची अँड्रोजिनस शेरवानी होती, जी खास मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केली होती. या पोशाखाची खास गोष्ट म्हणजे त्यावर हिऱ्यांनी जडवलेल्या स्लीव्हस् आणि मागील बाजूस सुंदर नक्षीकाम केलेलं होतं. या रॉयल लूकला अधिक खास बनवण्यासाठी ऐश्वर्याने क्लासिक लाल लिपस्टिकचा बोल्ड टच दिला होता. हा संपूर्ण लूक शाही आणि फॅशनेबल दिसत होता. ऐश्वर्याच्या लूकला उपस्थितांनी टाळ्या वाजवत पसंती दिली.
२० वर्षांनी थिएटरमध्ये येणार ‘The Simpsons Sequel’, चित्रपट कधी आणि कुठे होणार प्रदर्शित
५१ वर्षांच्या ऐश्वर्याने, जबरदस्त आत्मविश्वास आणि ग्लॅमरसोबत रॅम्पवर वॉक केला आणि उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्या-गजरात आपली छाप सोडली. म्पवॉक संपल्यानंतर ऐश्वर्याने उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांकडे हात जोडून ‘नमस्ते’ केलं, ज्यामुळे तिच्या हावभावातून दिसणारं भारतीयपण सर्वांना भावलं. त्यानंतर तिने फ्लाइंग किस करत सर्वांना मोहून टाकलं.या पॅरिस ट्रिपमध्ये ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन सुद्धा तिच्यासोबत होती. एका व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या आईच्या मागे चालताना दिसली. का व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या आईच्या मागे चालून तिची साथ देताना दिसली. ज्यामुळे माय-लेकीच्या नात्याची बॉन्डिंग दिसून आली. रॅम्प वॉकनंतर ऐश्वर्या अनेक आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल्स आणि अभिनेत्रींसोबत स्टेजवर आली. तिने हेइडी क्लम आणि तिची जुनी मैत्रीण ईवा लोंगोरिया यांच्याशी भेटून गप्पा मारल्या आणि फोटो काढले.