(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मिलान फॅशन वीक 2025 मध्ये आलिया भट्ट आणि BTS चा सदस्य जिन यांची एकत्र हजेरी चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला. त्यांची ही अनपेक्षित उपस्थिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि या फॅशन सीझनमधील सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरली. मिलान फॅशन वीक 2025 मध्ये आलिया भट्टने आपल्या दमदार आणि स्टायलिश लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने परिधान केलेल्या गोल्डन स्लिप ड्रेस, ब्लॅक फर कोट, आणि गॉथिक टच असलेले अॅक्सेसरीज यामुळे तिचा लूक बोल्ड, सशक्त आणि ग्लॅमरस वाटत होता. तिच्या या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
BTS चा लोकप्रिय सदस्य जिन याने मिलिटरी सर्व्हिसनंतर मिलान फॅशन वीक 2025 मध्ये जबरदस्त कमबॅक केला. त्याने घातलेला पांढऱ्या शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर्स असलेला क्लासिक लूक चाहत्यांना भुरळ घालणारा ठरला. त्याचा वेट-लुक हेयरस्टाइल आणि हातात असलेली स्टायलिश ब्लॅक बॅग यामुळे त्याचा फॅशन स्टेटमेंट आणखी उठून दिसला.
मिलान फॅशन वीकमध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा क्षण तेव्हा घडला, जेव्हा आलिया भट्ट आणि BTS चा जिन एकाच फ्रेममध्ये दिसले. Gucci ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या आलियाचा ऑन-कॅमेरा इंटरव्ह्यू सुरू असताना, तिच्या मागे जिन निवांतपणे बसलेला दिसला आणि हे दृश्य लक्षात येताच सोशल मीडियावर प्रचंड जल्लोष झाला. देसी फॅन्ससाठी हा क्षण ‘स्मरणात राहणारा’ ठरला.
international paps and fans going crazy over alia bhatt at milan fashion week ‼️ pic.twitter.com/QUJTfmvFE4 — 🦢 (@softiealiaa) September 23, 2025
“मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलं होतं”, ‘विवाह’ फेम अमृता रावने सांगितला धक्कादायक अनुभव
आलिया भट्ट आणि जिन एकाच ठिकाणी दिसल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे, आलिया आणि जिन आता एकाच हवेत श्वास घेत आहेत!”, तर दुसऱ्याने म्हटलं, “Bollywood x BTS हे आता खरं वाटतंय!”