फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम
दक्षिण सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी हीने तीच्या दमदार अभिनयाने प्रक्षेकांच्या मनात नेहमी खास स्थान मिळवले आहे. मात्र अनुष्का शेट्टीने केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून चाहते चकीत झाले आहेत.या पोस्टमधून अभिनेत्री अनुष्का शेट्टीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी एक्सवर तिने ही पोस्ट केली आहे. ज्यात तिने सोशल मिडीयापासून ब्रेक घेत असल्याचे लिहिले आहे.एका साध्या डायरीच्या पानावर हस्ताक्षरात हा मेसेज तिने लिहिला आहे.
या मेसेजमध्ये ती म्हणते, ‘सोशल मीडियापासून थोड्या काळासाठी दूर जात आहे, फक्त जगाशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी आणि स्क्रोलिंगच्या पलीकडे काम करण्यासाठी, जिथे आपण सर्वांनी प्रत्यक्षात सुरुवात केली होती.
लवकरच भेटू अधिक कथा आणि अधिक प्रेमासह…. नेहमीच कायमचे… नेहमीच हसत राहा… खुप प्रेम… अनुष्का शेट्टी.
या मेसेजवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
अनुष्का शेट्टीच्या या मेसेजवर अनेक चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी तिला खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.काहींनी तिला लवकर परत येण्याबाबत विनंती केली आहे.
घाटी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती
अनुष्का शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट घाटी ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.चित्रपटाने एका आठवड्यात भारतात फक्त ₹६.६४ कोटींची कमाई केली. क्रिश जगरलामुडी लिखित आणि दिग्दर्शित, घाटीमध्ये अनुष्का विक्रम प्रभूसोबत मुख्य भूमिकेत आहे.राजीव रेड्डी आणि साई बाबू जगरलामुडी यांनी फर्स्ट फ्रेम एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मीशा ओटीटीवर प्रदर्शित, या प्लॅटफॉर्मवर कथिरचा मल्याळम पहिला थ्रिलर पहा…
अनुष्का शेट्टीचा पुढचा चित्रपट
ती रोजिन थॉमसच्या आगामी हॉरर फॅन्टसी थ्रिलर ‘कथानर – द वाइल्ड सॉर्सर’ मध्ये दिसणार आहे.
या चित्रपटातून अनुष्का मल्याळम चित्रपटात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती नीला नावाच्या विणकराची भूमिका साकारणार आहे.
अनुष्का व्यतिरिक्त, या चित्रपटात जयसूर्य, प्रभु देवा आणि विनीत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.