(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट रोजी पहाटे कर्करोगामुळे निधन झाले. प्रियाने वयाच्या 38 व्या वर्षी मीरा रोड येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. प्रिया गेल्या कित्येक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. 31 ऑगस्टरोजी तिची ही झुंज अपयशी ठरली.
अनेकांनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली. अशातच प्रिया मराठेचा चुलत भाऊ सुबोध भावेने 13 दिवसांनी प्रियाच्या आठवणीत आणखी एक पोस्ट लिहिली आहे.. तर नुकत्याच एका मुलाखतीत प्रिया मराठेसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुबोधने सांगितलं की, “प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं. पण ती त्यातून बाहेर पडली आणि पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक आणि मालिकांमधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली. पण, त्या कर्करोगाने काही तिची पाठ सोडली नाही.
दुर्दैवाने प्रियाचे वडील म्हणजे माझे सुहासकाका खूप लवकर गेले. तिचं जाणं तिची आई, शंतनू आणि मोठा भाऊ विवेक यांच्यासाठी ते जास्त धक्कादायक असेल कारण त्यांच्यासोबत तिचा जास्त सहवास होता. दुर्दैवाने तिचे वडील म्हणजे सुहास काका ती खूप लहान असताना गेला.
एक कलाकार म्हणून आणि मोठा भाऊ म्हणून मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं. आजारपणात माणसं खचतात पण मी तिला तसं कधीच पाहिलं नाही. स्मिता तळवलकर, रसिका जोशी आणि प्रिया लढाऊ होत्या ज्या आजाराशी लढून परत आल्या होत्या. पण शेवटी प्रिया सेटवर यायची बंद झाली तेव्हा मला त्याबद्दल कळलं होतं. मी तिला अनेकदा मेसेज करायचो पण तिला भेटायचं नव्हतं. ती उत्तर द्यायची नाही तेव्हा मला कळलं की तिला त्याबद्दल बोलायचं नव्हतं. ती परत येईल असा मला विश्वास होता ती लढली पण त्या कॅन्सरने तिचा घास घेतला” असे सुबोध भावे पुढे म्हणाला.
प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं?
प्रियासाठी शंतनूने काम सोडलं होतं आणि अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने एक मालिका हातात घेतली होती. प्रिया जायच्या आदल्या रात्री शंतनूचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता.त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रियाने शंतनू आणि तिच्या आईसमोर प्राण सोडले. हे सगळं सांगताना सुबोध भावेला अश्रू अनावर झाले.