(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आर्यन खान याची बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ आता ऑनलाइन डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. आर्यनने 20ऑगस्ट रोजी वडील शाहरूख खान आणि आई गौरी खान यांच्यासोबत या सीरिजचा प्रिव्ह्यू प्रदर्शित केला होता, यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. द ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही आर्यन खानची वेब सिरीज नेटफ्लिक्सवकर 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याबदल नेटफ्लिक्सने पोस्ट करत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सने लिहिले आहे की “हे लवकरच… जोरदार टक्कर देणार आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ उद्या प्रदर्शित होत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर.”
आर्यन खानचा बॉलिवूड दिग्दर्शक म्हणून पहिला डेब्यू
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आता अभिनय नव्हे, तर दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याची पहिली वेब सिरीज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही नेटफ्लिक्सवर १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज रेड चिलीज एंटरटेनमेंटने निर्मित केली असून, आर्यनसोबत बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान हे सह-निर्माते आहेत. ही सिरीज एक बॉलिवूडच्या झगमगाटामागचं गोंधळलेलं आणि वास्तववादी जग दाखवते. यात एक्शन, विनोद, भावना यांचा समतोल असून, बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी धडपडणाऱ्या कलाकारांचे आणि स्वप्नाळू लोकांचे संघर्ष अधोरेखित केले आहेत.
प्रियंका चोप्राच्या अफेअरबद्दल प्रल्हाद कक्कर यांचा धक्कादायक खुलासा…
वेब सीरिजमध्ये काय आहे?
या सिरीजचा मुख्य पात्र आसमान सिंग आहे, जो एक बाहेरचा तरुण असतो आणि बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवतो. त्याच्या या यशाच्या प्रवासात त्याला मदतीसाठी त्याचे सामान्य कुटुंब आणि विश्वासू मित्र मिळतात. त्याच्या कुटुंबात त्याचा काका अवतार, आई नीता सिंग, आणि वडील राजत सिंग यांचा समावेश आहे.
सिरीजमध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांची जोरदार उपस्थिती
आर्यन खानच्या सिरीजमध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांची जोरदार उपस्थिती पाहायला मिळणार आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग, करण जोहर, आणि बदशाह यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांनी या सिरीजमध्ये कॅमिओ केले आहे.