farah khan
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) आपल्या पत्नीमुळे तर चर्चेत असतोच पण त्याच्यावरच्या आरोपांमुळेही अनेकदा तो चर्चेचा विषय बनतो. राज कुंद्राचं नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात समोर आलं होतं. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दोन महिने जेलमध्ये घालवल्यानंतर राज कुंद्राला जामीन मिळाला. या सगळ्या प्रकरणात राज कुंद्राची बदनामी झाली. मात्र आता अशी माहिती मिळाली आहे की, कोरियोग्राफर आणि फिल्म मेकर फराह खान (Farah Khan) आता राज कुंद्राच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार असल्याचा अंदाज लावला जातोय.
फराह खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे फराहच्या नव्या सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. फराह खान आणि कॉमेडियन मुनावर फारुकी यांचा हा व्हिडिओ आहे. छोट्या व्हिडिओमध्ये दोघांनी ‘राज’ नावाच्या व्यक्तीवर बायोपिक प्रोजेक्ट बनवण्याबद्दल चर्चा केली आणि चाहत्यांसमोर नवं कोडं निर्माण केलं. मात्र त्यांच्या चर्चेवरून राज कुंद्रावर बायोपिक येणार असा अंदाज लावला जातोय.
व्हिडिओचा शेवट UT 69 असलेल्या फ्रेमने झाला आहे. शेवटच्या स्लाइडमध्ये 27 ऑक्टोबरच्या तारखेचाही उल्लेख आहे आणि हा चित्रपट इतक्या लवकर कसा प्रदर्शित होईल असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
फहार खान या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी करतेय याची सगळे वाट बघतायत.