संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी’ (Heeramandi) वेबसिरीजची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. या मालिकेबाबत दर काही दिवसांनी चाहत्यांना नवनवीन माहिती दिली जात आहे. या वेब सिरीजचा फर्स्ट लूक टीझर आणि गाणे रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता अनेक पटींनी वाढली आहे. या मालिकेत सोनाक्षी सिन्हा ते मनीषा कोईराला यांसारख्या प्रतिभावान अभिनेत्री आपल्या अभिनय कौशल्याचे प्रदर्शन करताना दिसणार आहेत. आता या मालिकेतील फरदीन खान आणि शेखर सूमनचा लूकही समोर आला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
[read_also content=”शाहिद-कृतीच्या चाहत्यांसाठी आंनदाची बातमी, तेरी बातों मे ऐसा उलझा जिया ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/teri-baaton-mein-aisa-uljha-jiya-release-on-ott-platform-amazon-prime-videos-nrps-520935.html”]
‘हिरामंडी’मधील फरदीनचा लूक रिलीज
‘हिरामंडी’ मधील फरदीन खान आणि शेखर सुमनच्या लूकला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. या लूकमध्ये फरदीन वली मोहम्मदच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता बऱ्याच दिवसांनी नवाबी लूकमध्ये दिसत आहे. हा लूक शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले, ‘प्रेम आणि कर्तव्याच्या वादळात अडकलेला वली मोहम्मद त्याच्या शाही जबाबदाऱ्यांसोबत त्याच्या मनातील इच्छा जुळवण्याचा प्रयत्न करतो.
<di
फरदीन खानचं पुनरागमन
वली मोहम्मदच्या रूपात फरदीन खानने पडद्यावर त्याचे भव्य पुनरागमन केले आहे आणि चाहत्यांना बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुकता आहे. मात्र, फरदीनच्या लूकनंतर बॉलिवूड वर्तुळात पुन्हा एकदा ‘हिरामंडी’ची चर्चा रंगली आहे. संजय लीला भन्साळी मालिकेतील प्रत्येक नवीन लूक प्रदर्शित केल्यानंतर चाहत्यांना अधिक उत्साहित करत आहेत. चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर करताना शेखर सुमनने लिहिले की, ‘मल्लिकाजानच्या पायाशी आपली निष्ठा ठेवून, झुल्फिकार आणि त्याची चमकणारी महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये एकच गोष्ट उभी आहे.’
‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
‘हिरामंडी’चा प्रीमियर 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे. संजय लीला भन्साळी यांची ही पहिली वेब सिरीज आहे. ‘हिरामंडी’ वेब सिरीजमध्ये आदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.
Web Title: Fardeen khan shekhar suman first look goes viral from sanjay leela bhansali heeramandi goes viral nrps