Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठी सिनेमा मार खाणार नाही… Fight is On” उत्तरच्या रिलीजनंतर क्षितिज पटवर्धन

नवा सिनेमा उत्तर या चित्रपटासाठी क्षितिज पटवर्धन यांनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनीदोन महाकाय सिनेमासमोर मराठी सिनेमा उत्तरची सध्याची स्थिती सांगितली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 20, 2025 | 07:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • @kshitijpatwardhan या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे
  • “मराठी आता मार खाणार नाही!”
  • दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ
क्षितिज पटवर्धन यांचा नवा सिनेमा ‘उत्तर’ सध्या सिनेमागृहात झळकत आहे. सिनेमाचे उत्तम प्रदर्शन पाहून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. उत्तर सिनेमा पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक आधीच आतुर होते, त्यात सिनेमा पाहण्यासाठी गर्दीही अफाट झाली आहे. दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी त्यांच्या @kshitijpatwardhan या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे आणि कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “मराठी आता मार खाणार नाही!”

‘तू मेरी मैं तेरा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रिलीजपूर्वच कार्तिक-अनन्या यांच्या चित्रपटाविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल

एकंदरीत त्यांनी कॅप्शनमध्ये सिनेमाची सध्याची स्थितीही नमूद केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “यापुढे मराठी मार खाणार नाही! चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर ‘धुरंधर’ आणि चार पाच वर्षातून एकदा येणार ग्लोबल फेनॉमेना ‘अवतार’ यांच्या सोबत माझा पहिला सिनेमा ‘उत्तर’ प्रदर्शित झाला. ‘धुरंधर’ ने रणवीर च्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. बावीस बावीस शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं कि व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी आजिबात तक्रार करायची नाही, मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही. उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं. १२ ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला, पण तेव्हाच वाटलं की सिनेमा १९ ला रिलीज होतोय असं ट्रीट करूया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली, सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली. परीक्षणं अप्रतिम आली, वीकडेज ला सुद्धा शहरी सेंटर्स मध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हल ला सिलेक्शन झालं. बुक माय शो वर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतायत. आमच्याकल्पनांची दखल घेतायत. आज दुसरा विकेंड आहे आणि ६ ठिकाणी शोज वाढले आहेत. अवतार चे रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशा वेळी ‘मराठी फॅमिली फिल्म’ म्हणून ‘उत्तर’ चं पोझिशनिंग केलं, ज्याला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय! अशी वेळ या आधी आणि या पुढे अनेक मराठी सिनेमावंर येणार आहे, तेव्हा स्वतःच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं कि या सगळ्यात एक मेसेज जाणं गरजेचं होतं कि कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!”

Serial Promo: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट: समर-स्वानंदीच्या हनीमूनवर सावट, अपघातातून वाचेल का लोकप्रिय जोडी? 

या भल्या मोठ्या कॅप्शनमध्ये त्यांनी मराठी सिनेमा ‘उत्तर’ या दोन धुरंधर आणि अवतारसमोर कसा टिकून आहे आणि कसा लढा देत आहे? या बाबत स्पष्टता दिली आहे.

Web Title: Kshitij patvardhan post on uttar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 07:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.