(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये आशिया कप 2025 चा सामना चांगलाच रंगला. टीम इंडियानं फायनलमध्ये बाजी मारली आणि आशिया कप आपल्या नावे केला. हा सामना सगळ्यांसाठी महत्त्वाचा होता. सगळेच टीव्हीकडे डोळे लावून बसले होते. हा सामना पाहण्यासाठी मराठी कलाविश्वातील अभिनेता मयुरेश पेमने देखील दुबईत हजेरी लावली. मयुरेश पेम हा सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातूव तो त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो. मयुरेश पेम याच्या सोबत त्याचे वडील देवेंद्र पेम आणि भाऊ मनमीत पेम हे देखील उपस्थित होते. त्याने वडिलांना हा सामना दाखवून त्यांचे ४० वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
क्रिकेटचे कट्टर चाहते असलेल्या आपल्या वडिलांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाईव्ह पाहण्याची तीव्र इच्छा होती. मयुरेशने सांगितले की, ”एक स्वप्न पूर्ण झाले. माझे वडील क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत आणि स्टेडियममध्ये बसून भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना थेट पाहणे हे त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न होते. योगायोगाने, माझा दुबईतील शो आणि हा सामना एकाच दिवशी होता, त्यामुळे मी ही संधी गमावू शकलो नाही! मी त्यांना सरप्राईज म्हणून सामन्याची तिकीटं दिली आणि त्यांचे ४० वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण केले. असे क्षण अमूल्य असतात. ”
करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’
भारत-पाकिस्तानचा सामना वडिलांसोबत थेट स्टेडियममध्ये पाहण्याचा अनुभव त्याच्यासाठी खूप खास होता. या खास क्षणासाठी तिकीटांची व्यवस्था केल्याबद्दल त्याने अबुधाबी महाराष्ट्र मंडळ आणि विजय माने सरांचे विशेष आभार मानले आहेत. त्याच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणि फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.
मयुरेश पेम हे मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने नाटक आणि चित्रपट यामध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. मयुरेश त्याच्या अभिनय कौशल्यामुळे रसिकांच्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे.