येवा कोकण आपलाच आसा असं कोकणकर कायमच म्हणतात. सहसा असं होतं की करियर करण्यासाठी लोकं गावखेड्यातून मुंबईत येतात मात्र असे काही जण असतात की जे मुंबईतून गावी स्थलांतर करतात आणि स्वत:चं करियर करतात. त्यातील एक जोड़ी म्हणजे Red Soil Stories चा युट्युबर शिरीष गवस आणि त्याची पत्नी. Red Soil Stories च्या माध्यमातून कोकणाची खाद्यसंस्कृती आणि निसर्गसंपन्न कोकणाचा अनुभव Red Soil Stories च्या माध्यमातून नेटकऱ्यांना कायमच मिळत आलेला आहे. हाच Red Soil Stories चा युट्युबर शिरीष गवसचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
शिरिषला ब्रेमहॅमरेज होता. वयाच्या 33 व्या वर्षी शिरिषने या जागातून एक्झिट घेतली. शिरिषतच्या निधनाची माहिती कोकण हर्टेट गर्ल अंकिता वालावलकरने दिली आहे. शिरिषची पत्नी आणि शिरिषने मुंबई सोडून कायमस्वरूपी वास्तव्य़ कोकणात करायचं ठरवलं. शिरिषची पत्नी पुजा आणि शिरिषने कोविडपासून कोकणातीसल खाद्यपदर्थांचे रेसिपी व्हिडीओतून अनेकांची मनं जिंकली. पारंपरिक कोकणी पदार्थ आणि कोकणचा निसर्ग यामुळे रेड सॉईल स्टोरीजने कमी दिवसात नेटकऱ्यांची मनं जिंकली. शिरिषच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरा कोसळला आहे तर चाहत्यांना देखील हा मोठा धक्का होता.
शिरिष मेंदूच्या गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर गोव्यातील रुग्णालायात उपचार सुरु होते. गेले अनेक दिवस शिरिष मेंदूच्या आजाराशी झुंज देत होता अखेर त्याची ही लढाई अयशस्वी झाली. शिरिषच्या पश्चात त्याचं कुटुंब, पत्नी आणि एक वर्षाची मुलगी आहे. शिरिषची पत्नी पुजा ही प्रोफेशनल आर्ट डायरेक्टर आहे. सिनेविश्वतील काम सोडून तिने गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. शिरिष आणि पुजाने आतापर्यंत जेवढे व्हिडीओ पोस्ट केले त्या सगळ्यांना नेटकऱ्यांनी तुफान प्रसिसाद दिला आहे.