Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगीताचा अमीट ठसा उमटवणारे संगीतकार अविनाश – विश्वजीत यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती

अविनाश-विश्वजीत (Avinash Vishwajeet) म्हणजे अर्थातच अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी ही मराठमोळ्या संगीतकारांची (Musician Duo Avinash Vishwajeet) जोडी. या जोडीतील विश्वजीत यांच्याकडे संगीतासोबतच गीतलेखनाचीही कला आहे.

  • By साधना
Updated On: Jun 16, 2022 | 05:59 PM
avinash vishwajeet

avinash vishwajeet

Follow Us
Close
Follow Us:

संगीत क्षेत्राच्या (Music) नभांगणात आज बरेच संगीतकाररूपी तारे चमकत आहेत. नावीन्याचा ध्यास घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बऱ्याच संगीतकारांनी मनोरंजन विश्वात नाव कमावलं आहे. या यादीत सध्या आघाडीवर असलेली संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत (Avinash Vishwajeet). या जोडीनं २०१० मध्ये सिनेसृष्टीतील आपली कारकिर्द सुरू केली. अविरतपणे १२ वर्षे काम करून संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या संगीताचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही कायम जमिनीवर राहून संगीताची सेवा करण्याचं ब्रीद जपत अविनाश-विश्वजीत यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी मनोरंजन विश्वाला दिली आहेत.

[read_also content=”सुपरहिट मनोरंजनाचा बॉम्ब, ‘या’ दिवशी ‘टकाटक २’ सिनेमागृहांमध्ये झळकणार https://www.navarashtra.com/movies/takatak-2-movie-release-date-announced-nrsr-293407.html”]

‘कधी तू रिमझिम झरणारी…’, ‘ओल्या सांज वेळी…’, ‘ह्रदयात वाजे समथिंग…’ ही गाजलेली रोमँटिक गाणी आठवली की आपोआपच संगीतकार अविनाश-विश्वजीत यांची आठवण होते. रोमँटिक गाणी म्हणजे अविनाश-विश्वजीत हे समीकरण जणू तयार झालं, मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या दोन्ही चित्रपटांच्या गाण्यांतून लोकसंगीताचा रांगडा बाज दाखवत वेगळी झलक रसिकांना दाखवून दिली आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचणाऱ्या ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या दोन सुपरहिट मराठी चित्रपटांतील ‘धर्मवीर’मधील ‘असा हा धर्मवीर…’ या टायटल साँगसह ‘सरसेनापती हंबीरराव’मधील ‘हंबीर तू, खंबीर तू…’ हे गाणं रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या दोन चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी झालेल्या अविनाश-विश्वजीत यांचे लवकरच आणखी काही महत्त्वपूर्ण चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

अविनाश-विश्वजीत म्हणजे अर्थातच अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी ही मराठमोळ्या संगीतकारांची जोडी. या जोडीतील विश्वजीत यांच्याकडे संगीतासोबतच गीतलेखनाचीही कला आहे. विश्वजीत आणि अविनाश यांनी एकत्रितपणे २००४ पासून आपली कारकिर्द सुरू केली. सुरुवातीला पार्श्वसंगीत आणि नंतर संगीत दिग्दर्शक असा नावलौकीक मिळवणारी ही संगीत दिग्दर्शकांची जोडी आज रसिकांची आवडती बनली आहे. रेडिओ मिर्ची म्युझिक पुरस्कार, सांस्कृतिक कलादार्पण पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर अशा वेगवेगळया पुरस्कार महोत्सवांमध्ये त्यांनी कायम बाजी मारत आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाद्वारे अविनाश-विश्वजीत यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं. या चित्रपटातील सर्वच गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत आहेत. त्यापूर्वी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘ऑक्सिजन’, ‘आईचा गोंधळ’, या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. संगीत दिग्दर्शनाकडे वळताना पदार्पणातच ‘मुंबई-पुणे-मुंबई’सारखा सुपरडुपर हिट सिनेमा दिल्यानंतर या जोडगोळीनं मागं वळून न पाहता एक पेक्षा एक सरस चित्रपटांना संगीत दिलं. ‘धागेदोरे’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘संभा’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘पोपट’, ‘सांगतो ऐका…!’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘कॅपुचीनो’, ‘गुरुपौर्णिमा’, ‘क्लासमेट्स’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘रोशन व्हिला’, ‘ती सध्या काय करते’, ‘कंडिशन्स अप्लाय’ या चित्रपटांनी अविनाश-विश्वजीत यांची कारकिर्द बहरली आहे.

Web Title: Musician duo avinash vishwajeet completed 12 years in music industry nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2022 | 05:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.