• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Myra Vaikul To Shine In The Film Mukkam Post Devachan Ghar

मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात; बाप्पाच्या चरणी चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च

मायरा वायकुळ लवकरच ,मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटात तिने अभिनय केला आहे. तसेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 19, 2024 | 08:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.

‘जेल म्हणजे सर्कस…’ विक्रमादित्य मोटवानीचा ‘ब्लॅक वॉरंट’चा टीझर लाँच, या ओटीटी प्लॅटफॉमवर होणार प्रदर्शित!

ए सी डी कैटचे मनीष कुमार जायसवाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली असून या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केले आहे. किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.

अल्पावधीतच जगभरात पोहचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. तिच्या अभिनयाने आणि कार्याने तिने जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. मायरा वायकुळच्या अभिनयाने चित्रपटाच्या कथेला एक वेगळा आणि भावनिक आयाम दिला आहे. या चित्रपटात तिच्या सह अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. हे सर्व कलाकार आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एक खूप प्रभावी आणि खास रंग देत आहेत.

120 Bahadur: ‘120 बहादूर’ची रिलीज डेट जाहीर; फरहान अख्तर दिसणार जबरदस्त भूमिकेत!

चित्रपटाच्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या ‘पोस्टकार्ड’च्या प्रमोशनचा आणि चित्रपटाशी नक्की काय संबंध आहे, हे देखील एका विशिष्ट प्रकारे महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर चाललेलं पोस्टकार्ड प्रमोशन चित्रपटाच्या कथा आणि संदर्भांशी गहन संबंध ठेवत आहे, ज्यामुळे त्याचं आकर्षण प्रेक्षकांना आणखी वाढतं आहे. पण तरीही, चित्रपटाची संपूर्ण कथा आणि मायरा वायकुळची भूमिका काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्या दिवशी चित्रपटाचे पूर्ण स्वरूप आणि त्यातील सर्व मुख्य घटनांचा अनुभव प्रेक्षकांना मिळेल.

Web Title: Myra vaikul to shine in the film mukkam post devachan ghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 07:56 PM

Topics:  

  • myra vaikul

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Google Meet कॉल्स आता होणार आणखी फॅशनेबल, युजर्सना मिळणार मेकअप फिल्टर! 12 स्टाइलिश लुक्स फक्त एका क्लिकवर

Google Meet कॉल्स आता होणार आणखी फॅशनेबल, युजर्सना मिळणार मेकअप फिल्टर! 12 स्टाइलिश लुक्स फक्त एका क्लिकवर

pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व

pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व

“आता वेळ आली आहे…” कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबद्दल विकी कौशल उत्साहित, जोडपं लवकरच देणार गुडन्यूज

“आता वेळ आली आहे…” कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबद्दल विकी कौशल उत्साहित, जोडपं लवकरच देणार गुडन्यूज

LG Electronics Share: बंपर लिस्टिंगनंतरही ब्रोकरेज बुलिश, विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना दिला ‘हा’ सल्ला

LG Electronics Share: बंपर लिस्टिंगनंतरही ब्रोकरेज बुलिश, विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना दिला ‘हा’ सल्ला

Recipe : चवदार, गरमा गरम, वजन कमी करण्यासही मदत करेल ‘ भोपळ्याचं सूप’; हिवाळ्यात आहारात जरूर करा समावेश

Recipe : चवदार, गरमा गरम, वजन कमी करण्यासही मदत करेल ‘ भोपळ्याचं सूप’; हिवाळ्यात आहारात जरूर करा समावेश

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका

Ratnagiri News: आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अन्य मुलींच्या शोषणाची भीती; महाराजावर गंभीर आरोप

Ratnagiri News: आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अन्य मुलींच्या शोषणाची भीती; महाराजावर गंभीर आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.